September 8, 2024

Samrajya Ladha

पाषाण येथे ग्रामस्थांची ‘कार्यसम्राट मोफत महाआरोग्य शिबिर’ निमित्त बैठक संपन्न, ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

पाषाण :

सोमेश्वर फाउंडेशनच्या माध्यमातून माजी नगरसेवक सनी निम्हण यांच्यावतीने ‘कार्यसम्राट मोफत महाआरोग्य शिबिराचे’ आयोजन ६ ऑगस्ट रोजी करण्यात आलेले आहे. या शिबिराची माहिती पाषाण गावातील नागरिकांना समजावे व त्याचा प्रसार होऊन जास्तीत जास्त गरजु नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा म्हणून पाषाण गाव ग्रामस्थांसोबत बैठक सनी निम्हण विठ्ठल मंदिरात घेतली.

 

या बैठकीची माहिती देताना माजी नगरसेवक सनी विनायक निम्हण यांनी सांगितले की, आपल्या जीवनामध्ये आरोग्याला खूप महत्त्व असून आपले शरीर व्यवस्थित असणे आपल्यासाठी व आपल्या कुटुंबासाठी गरजेचे आहे. म्हणूनच नागरिकांसाठी कार्यसम्राट महाआरोग्य शिबिर केले आहे. यावेळी आपल्या कार्यसम्राट मोफत महाआरोग्य शिबिराची संपूर्ण माहिती आणि याद्वारे मिळणाऱ्या सोयी-सुविधांबाबत उपस्थितांना माहिती दिली. ग्रामस्थांनी देखील या शिबिरासाठी उत्सुकता दाखवून गरजू लोकांपर्यंत या शिबिराचा प्रसार करू व मोठया संख्येनं शिबिरास उपस्थित राहून लाभ घेऊ असा शब्द दिला.

‘कार्यसम्राट मोफत महाआरोग्य शिबिर’ तिन टप्प्यात होणार असून पहिल्या टप्प्यात ३१ जुलै ते ४ ऑगस्ट पर्यंत व चाचण्या व तपासण्या फ्री मध्ये करून घेतल्या जाणार आहेत. दुसरा टप्प्यात ६ऑगस्ट रोजी मोफत कॅम्प होणार असून ७ ऑगस्ट ते ७ ऑक्टोबर दरम्यान आवश्यक असणाऱ्या सर्व शस्त्रक्रिया मोफत केल्या जाणार आहेत : माजी नगरसेवक सनी विनायक निम्हण 

यावेळी ह.भ.प. शांताराम निम्हण, ह.भ.प. पांडुरंग आप्पा दातार, भगवान तात्या निम्हण, ज्ञानेश्वर पारखे, ॲड. नितीन कोकाटे, राहुल कोकाटे, ॲड. ज्ञानेश्वर निम्हण, भानुदास वळे, बबनराव भेगडे, भरत कोकाटे, रामभाऊ ववले, रघुनाथ निम्हण, उत्तम जाधव, ॲड. गोविंद कोकाटे, अरुण आप्पा निम्हण, विठ्ठल आप्पा निम्हण, गुलाब नाना दगडे आणि समस्त ग्रामस्थ उपस्थित होते.