पुणे :
महायुतीचे उमेदवार मा. चंद्रकांत दादा पाटील (कोथरूड) आणि मा. शंकरभाऊ मांडेकर (भोर, वेल्हा, मुळशी) यांच्या विजयात मोलाचे योगदान देणाऱ्या सर्व महायुती समर्थकांचे, पदाधिकाऱ्यांचे आणि कार्यकर्त्यांचे समीर चांदेरे यांनी आभार मानले आहेत.
समीर चांदेरे यांनी महायुतीच्या प्रत्येक घटकाची मेहनत, निष्ठा, आणि अथक परिश्रम यांची प्रशंसा केली. या निवडणुकीत संघाच्या विचारांसाठी, धर्मासाठी आणि महायुतीच्या विजयासाठी झोकून देऊन काम करणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांचे विशेष आभार मानले.
“हा विजय हा आपणा सर्वांच्या अथक परिश्रमाचा आणि एकजुटीचा परिणाम आहे. बूथ ते घराघरापर्यंत पोहोचून मतदारांशी संवाद साधणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी महायुतीच्या विचारांचा सन्मान राखला. या विजयाचे खरे शिल्पकार आपण सर्व आहात,” असे समीर चांदेरे यांनी सांगितले.
महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून लोकांना दिलेले आश्वासन पूर्ण करताना प्रत्येक कार्यकर्ता आणि मतदारांचा विश्वास कायम ठेवण्याचे आपले उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
Jai Shree Ram Jai Hindu Sarkaar








