November 9, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

बाणेरमध्ये गिरीधर हॉटेल ते पॅराडाईज सोसायटी रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण – बाबुराव चांदेरे यांच्यामुळे नागरिकांना दिलासा…

बाणेर :

बाणेर परिसरातील गिरीधर हॉटेल ते पॅराडाईज सोसायटी दरम्यानच्या महत्त्वाच्या रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण झाले असून नागरिकांना सुखकर प्रवासाचा दिलासा मिळाला आहे. माजी स्थायी समिती अध्यक्ष बाबुराव चांदेरे यांच्या प्रयत्नातून हे काम पूर्ण झाले.

पूर्वी या रस्त्यावर पावसाळ्यात खड्डे, चिखल आणि वाहतुकीतील अडचणींमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. मात्र नव्या डांबरीकरणामुळे आता या मार्गाला नवी झळाळी लाभली आहे.

भैरवनाथ सोसायटी, इंडस सोसायटी, पंचरत्न सोसायटी, अथर्व सोसायटी, मुक्ताई बंगला यांसह आजूबाजूच्या परिसरातील रहिवाशांना आणि या मार्गाने प्रवास करणाऱ्या सर्व नागरिकांना सुरक्षित व सोयीस्कर रस्ता उपलब्ध झाला आहे. मुलांच्या शालेय प्रवासात आणि ज्येष्ठ नागरिकांच्या पायी जाण्यातील अडचणी आता दूर झाल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

“चांगले रस्ते, सुविधा आणि सुरक्षित वातावरण देणे हेच माझे पहिले कर्तव्य आहे. नागरिकांच्या आनंदी चेहऱ्यांमधून मला पुढे अजून काम करण्याची प्रेरणा मिळते. बाणेर-बालेवाडी-सूस-म्हाळुंगे परिसरातील प्रत्येक कुटुंबाला उत्तम जीवनमान मिळावे, हा माझा ध्यास आहे,” असे बाबुराव चांदेरे यांनी सांगितले.

या डांबरीकरणामुळे परिसराचा चेहरामोहरा बदलून नागरिकांना दिलासा मिळाल्याचे रहिवाशांनीही समाधान व्यक्त केले.