पिरंगुट :
चैतन्य विद्या प्रतिष्ठान संचलित पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, पिरंगुट येथे इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांच्या वतीने आयोजित निरोप समारंभ विविध शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमांनी अत्यंत शिस्तबद्ध व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध सांस्कृतिक व बौद्धिक उपक्रमांमुळे संपूर्ण वातावरण आनंदमय झाले. पियुषा आल्हाट, अंतरा रायरीकर व वेदिका कालेकर यांनी केलेल्या प्रभावी भाषणांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. त्यांच्या विचारपूर्ण मांडणीमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, कृतज्ञता व प्रेरणा निर्माण झाली.
या प्रसंगी प्रमुख पाहुणे मा. आमदार शरद ढमाले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आपल्या भाषणात सांगितले की, “शिक्षण हे केवळ पुस्तकी ज्ञानापुरते मर्यादित नसावे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासाठी मूल्यसंस्कार, शिस्त व सामाजिक जाणीव तितकीच महत्त्वाची आहे. शाळा हे विद्यार्थ्यांच्या आयुष्याला योग्य दिशा देणारे मंदिर आहे.”
त्यांच्या या विचारपूर्ण वक्तव्याला उपस्थितांकडून विशेष दाद मिळाली.
यावेळी माजी आमदार शरद ढमाले, उत्तम अग्रवाल, ज्ञानदेव जोरी, संदीप धमदेरे, महादेव मारणे व संतोष येनपुरे हे मान्यवर पाहुणे उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे कौतुक करत त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. राजेंद्र बांदल यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात शाळेच्या शैक्षणिक परंपरेचा आढावा घेत शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी केलेल्या सातत्यपूर्ण मार्गदर्शनाचे कौतुक केले व विद्यार्थ्यांनी मिळालेल्या संस्कारांचा जीवनात उपयोग करावा, असे आवाहन केले.
कार्यक्रमाला संचालिका सौ. रेखा बांदल, कु. शिवानी बांदल, तसेच प्राचार्या सौ. आसावरी हंचाटे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी माध्यमिक विभागप्रमुख सौ. पूनम पांढरे, प्राथमिक विभागप्रमुख सौ. सना इनामदार व पूर्व-प्राथमिक विभागप्रमुख सौ. पल्लवी नारखेडे यांचे विशेष सहकार्य लाभले.
कार्यक्रमादरम्यान वर्गशिक्षिका सौ. रेश्मा भोसले यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांप्रती शुभेच्छा व्यक्त केल्या, तर सौ. सुवर्णा यादव यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले.
हा संपूर्ण निरोप समारंभ यजुर्वेद हाऊसच्या शिक्षकांनी व इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट नियोजन, शिस्तबद्ध आयोजन व जबाबदारीच्या भावनेतून यशस्वीरीत्या संपन्न केला. त्यांच्या कार्यक्षमतेमुळे कार्यक्रम अधिक भावनिक व संस्मरणीय ठरला.
✨ हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, कृतज्ञता, मूल्यसंस्कार व नेतृत्वगुण रुजवणारा ठरला असून पेरिविंकल शाळेच्या सर्वांगीण शिक्षणाची दिशा अधोरेखित करणारा व कायम स्मरणात राहणारा ठरला. ✨



More Stories
योगीराज पतसंस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप….
पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल, सूस येथे दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा भावस्पर्शी निरोपसमारंभ सोहळा संपन्न.
पेरिविंकल शाळेच्या बावधन शाखेच्या अंगणातून उज्ज्वल भविष्यासाठी – इयत्ता १० वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांचा भावस्पर्शी निरोप समारंभ उत्साहात संपन्न!!!