August 4, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

कोथरूड विधानसभा मधील पाषाण-सुतारवाडी लिंक रोड वरील कचऱ्यावरून राजकारण पेटले! अमोल बालवडकरांच्या इशाऱ्यानंतर प्रशासन खडबडून जागे; पण तत्परता फक्त ‘खास’ भागापुरतीच का?

पाषाण :

“मा. आयुक्त साहेब, माझा मतदारसंघ आता जनतेला स्वच्छ हवा आहे, बिनकामाचा कचरा जमा झाला आहे! कृपया हा कचरा लवकरात लवकर उचलावा… नाहीतर आम्हाला जनतेच्या सहकार्याने उचलावा लागेल!” नगरसेवक अमोल बालवडकर यांच्या या एका तुफानी आणि आक्रमक उपरोधक सोशल मीडिया पोस्टने पुणे महानगरपालिका (PMC) प्रशासनाचे पुरते धाबे दणाणले आहेत.

 

पोस्ट पडताच महापालिकेची चक्रे चक्रीवादळाच्या वेगाने फिरली आणि काही तासांतच संबंधित सुतारवाडी सुसरोड लिंक रोड वरील भागातील अनेक दिवसापासून पडत असलेला कचरा गायब झाला. बालवडकरांच्या या थेट इशाऱ्याने झोपलेले प्रशासन जागे झाले हे खरे, पण यासोबतच अनेक गंभीर आणि संतप्त सवाल आता उपस्थित होत आहेत.

मंत्री महोदयांचे ऑफिस शेजारी म्हणून ही ‘विशेष’ तत्परता दाखवली गेली का?

सर्वात मोठा आणि संतापजनक मुद्दा म्हणजे, जो कचरा इतक्या तातडीने उचलला गेला, तो नामदार कॅबिनेट मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या कार्यालयाच्या लगतच पडलेला होता! त्यामुळे आता सर्वसामान्य नागरिकांकडून सवाल उपस्थित केला जात आहे.

तसेच केवळ समोरील भागातील कचरा उचलला गेला असून बाजूला असलेला कचरा तसाच आहे. हि गंभीर बाब आहे.

 

You may have missed