बाणेर :
बाणेर नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने दिवाळीनिमित्त संस्थेतील कर्मचारी व दैनंदिन प्रतिनिधींना दिवाळी सरंजामाचे वाटप करण्यात आले. तसेच राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर दुष्काळग्रस्त नागरिकांना आर्थिक मदत करण्याची घोषणा संस्थेच्या वतीने करण्यात आली.
यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. दिलीप मुरकुटे, चेअरमन राजू शेडगे, व्हाईस चेअरमन संजय ताम्हाणे, कैलास आटोळे, विजय विधाते, रामदास विधाते, रूपाली सायकर, शितल भुजबळ, डॉ. सतीश मराठे, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपलक्ष्मी बेळगांवकर, ॲड. उमेश कदम आणि किरण मुरकुटे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना संस्थापक अध्यक्ष डॉ. दिलीप मुरकुटे म्हणाले, राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असल्याने यंदाची दिवाळी साधेपणाने साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. या परिस्थितीत दुष्काळग्रस्त नागरिकांनाही मदतीचा हात देण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे. संस्थेतील कर्मचारी आणि दैनंदिन प्रतिनिधींनी दिवाळी आनंदाने साजरी करावी, यासाठी त्यांना दिवाळी सरंजामाचे वाटप करण्यात आले असून सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी संस्थेच्या कर्मचाऱ्यांना ८.३३ टक्के दिवाळी बोनसचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला संस्थेचे कर्मचारी, सदस्य आणि दैनंदिन प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


More Stories
ट्रॅकवर खिळे, मैदानात दारूच्या बाटल्या म्हाळुंगे-बालेवाडी स्टेडियम मधे खेळाडूंच्या स्वप्नांचा चुराडा, सराव सोडून मैदान खासगी इव्हेंट साठी उपलब्ध..
बालेवाडीतील राजाभाऊ गुडदे फाउंडेशनतर्फे स्नेहवनमध्ये ‘बालदीपोत्सव ५’ उत्साहात साजरा, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांतील १८० मुलांसोबत दिवाळीचा आनंद द्विगुणित..
*औंध-बोपोडीतील चिमुकल्यांच्या कल्पकतेला मिळाली नवी झळाळी!**मोफत आकाशकंदील कार्यशाळेतून बालसर्जनशीलतेला प्रोत्साहन**नगरसेवक सनी विनायक निम्हण यांच्या पुढाकारातून विद्यार्थ्यांसाठी सामाजिक उपक्रम; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग*