स्नेहवन, चाकण :
दिवाळी म्हणजे आनंद, प्रेम, आपुलकी आणि माणुसकीचा सण. समाजातील गरजू मुलांच्याही आयुष्यात आनंदाचे क्षण फुलावेत, या उद्देशाने राजाभाऊ गुडदे फाउंडेशनतर्फे शनिवार, दिनांक ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी स्नेहवन येथे ‘बालदीपोत्सव ५’ हा उपक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.
स्नेहवन येथे वास्तव्यास असलेल्या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांसोबत दिवाळी साजरी करून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्याचा प्रयत्न फाउंडेशनच्या वतीने करण्यात आला. या उपक्रमांतर्गत एकूण १८० मुलांना दिवाळी फराळ, मोती साबण, पॉन्ड्स पावडर, तेल, उटणे, सुकामेव्याची पाकिटे आणि चॉकलेट्स भेट देण्यात आली.
या उपक्रमासाठी स्नेहवनचे संचालक श्री. अशोक देशमाने सर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. राजाभाऊ गुडदे फाउंडेशनच्या अध्यक्षा श्रीमती किरण गुडदे आणि संगीत गुडदे यांच्या पुढाकारातून तसेच फाउंडेशनच्या सामाजिक बांधिलकीतून हा उपक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमात मनोज माने, रीतिका आहुजा, शैलेश आपोटिकर, वैभव नाईक, विपुल शिंदे, किरण आपोतिकर, नचिकेत कवठेकर,तनुज नागरानी, धनंजय गवारे, दर्शना गवारे, अक्षय मालुसरे, प्रिती तांबे, सुधीर चक्रे, खंजन मंकड, गीता राजपूत, नेहा रसाने, राहुल बाकडे आणि नचिकेत यांचेही योगदान व सहभाग लाभला.
मुलांना केवळ भेटवस्तू देणे एवढाच या उपक्रमाचा उद्देश नसून, त्यांच्यासोबत प्रेमाचे क्षण घालवणे, त्यांना आपलेपणाची जाणीव करून देणे आणि त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणे, हा या उपक्रमामागील मुख्य हेतू होता. मुलांच्या चेहऱ्यावरील आनंदाने या उपक्रमाला विशेष अर्थ प्राप्त झाला.
‘प्रत्येक मुलाच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणे, त्याला प्रेमाची ऊब देणे आणि त्याच्या आयुष्यात आनंदाचे रंग भरणे, हीच खरी दिवाळी!’ या भावनेतून राजाभाऊ गुडदे फाउंडेशन सातत्याने सामाजिक उपक्रम राबवत आहे.
‘Help One, Inspire Many’ हे ब्रीदवाक्य जपत फाउंडेशन गरजू मुलांचे शिक्षण, युवकांना करिअर मार्गदर्शन, महिला सक्षमीकरण, सामाजिक जनजागृती आणि गरजू व्यक्तींना मदत अशा विविध क्षेत्रांत कार्यरत आहे.
समाजातील वंचित आणि गरजू घटकांच्या जीवनात आनंद निर्माण करणे, त्यांना आधार देणे आणि माणुसकीची ज्योत तेवत ठेवणे, हाच ‘बालदीपोत्सव ५’ या उपक्रमाचा संदेश आहे.



More Stories
*औंध-बोपोडीतील चिमुकल्यांच्या कल्पकतेला मिळाली नवी झळाळी!**मोफत आकाशकंदील कार्यशाळेतून बालसर्जनशीलतेला प्रोत्साहन**नगरसेवक सनी विनायक निम्हण यांच्या पुढाकारातून विद्यार्थ्यांसाठी सामाजिक उपक्रम; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग*
‘मिस अँड मिसेस हेरिटेज इंडिया २०२६’चा ऐतिहासिक सोहळा दिमाखात संपन्न!
*क्रीडाक्षेत्रात पेरिविंकल स्कूलच्या सुस शाखेचा दैदिप्यमान सुवर्ण-रौप्य-कांस्य त्रिवेणी संगम!*