महाळुंगे :
महाळुंगे (ता. मुळशी) येथे भोर–राजगड–मुळशी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मा. शंकरभाऊ मांडेकर यांच्या स्वखर्चातून तब्बल ₹1.50 कोटींच्या निधीतून महाळुंगे–नांदे रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाचे भूमिपूजन त्यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
दीर्घकाळ प्रलंबित असलेला हा रस्ता आता नव्या दर्जेदार रूपात विकसित होत असून महाळुंगे–नांदे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. वाहतुकीची गुणवत्ता, सुरक्षितता आणि दैनंदिन प्रवासाची सोय यात मोठी सुधारणा होणार असून कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
विकासकामांबाबत सदैव कटिबद्ध असलेल्या आमदार शंकरभाऊ मांडेकर यांच्या पुढाकारामुळे या भागातील अनेक विकासप्रश्नांना गती मिळत आहे. परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले हे पाऊल निश्चितच प्रशंसनीय आहे. या डांबरीकरणामुळे नागरिकांच्या दैनंदिन जीवनात सकारात्मक बदल घडून येणार असून परिसराच्या विकासासाठीचे हे पाऊल अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.
कार्यक्रमाला प्रमुख मान्यवरांच्या उपस्थिती लाभली, त्यामध्ये माजी स्थायी समिती अध्यक्ष बाबुराव चांदेरे, पीडीसीसी बँकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे, माजी नगरसेवक प्रमोद निम्हण, माजी नगरसेविका सुषमा निम्हण, माजी नगरसेविका रोहिणी चिमटे, पुणे शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या कार्याध्यक्ष पूनम विधाते, राष्ट्रवादी काँग्रेस नेत्या ज्योती बालवडकर, उपाध्यक्ष पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस राहुल बालवडकर, युवक अध्यक्ष पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस समीर चांदेरे, कार्याध्यक्ष पुणे शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस मनोज बालवडकर, राष्ट्रवादी काँग्रेस नेते विशाल विधाते, महाळुंगे पोलीस पाटील शांताराम पाडळे, माजी उपसरपंच युवराज कोळेकर, पैलवान समीर कोळेकर, माजी सरपंच नामदेवराव गोलांडे, सामाजिक कार्यकर्ते मदन पाडळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते निलेश पाडाळे, मुळशी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष अनिल कामटे, माजी उपसरपंच अजिंक्य निकाळजे, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब खेरे, माजी सैनिक भगवान खैरे आणि सोसायटीचे चेअरमन अंकुश पाडळे यांचा समावेश होता. तसेच महाळुंगे–नांदे परिसरातील ग्रामस्थ, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



मनापासून आंनद झाला, फार वर्षांपासून नागरिक त्रास सहन करत आहेत…
आता काम सुरू होणे, ते चांगल्या प्रतीचे होणे आणि टिकणे महत्वाचे. नाहीतर एक पाऊस पडला की डांबर विरघळून जातं.
आता Mercedes Benz Showroom पासून रस्ता कधी होईल ह्याची वाट बघत आहोत. 2018 साली हायटेक सिटी म्हणून उदघाट्न झालं आहे…जय महाराष्ट्र 🙏