November 3, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

*प्रसिद्ध डायरेक्ट सेलिंग कंपनी ‘प्रोव्हेदा इंडिया’चा ७ वा वर्धापन दिन पुण्यात दणक्यात संपन्न!*

पुणे :

डायरेक्ट सेलिंग उद्योगात वेगाने प्रगती करणाऱ्या ‘ *प्रोवेदा इंडिया’ (Proveda India)* या अग्रगण्य कंपनीचा ७ वा वर्धापन दिन (‘सन्मान पुणे २०२६’ – Samman Pune) नुकताच पुण्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे अत्यंत उत्साहात आणि दिमाखात पार पडला. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून तसेच दक्षिण भारतातील विविध राज्यांतून हजारो वितरक आणि प्रतिनिधी या ऐतिहासिक सोहळ्यासाठी उपस्थित होते. 

या सोहळ्याचे दीपप्रज्वलन आणि मुख्य मार्गदर्शन कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक (Managing Director) श्री. असीम सूद यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. त्यांच्यासोबत रिजनल डायरेक्टर श्री. राजकुमार खोगेसाना आणि सामाजिक कार्यकर्ते संदीप ढमढेरे सर हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे संपूर्ण आणि अतिशय नेटके नियोजन टेरिटरी डायरेक्टर श्री. प्रशांत मोरे यांनी केले होते, व्हाईस प्रेसिडेंट मनोज मोरनकर सर तसेच मॅनेजिंग पार्टनर्स दीपक साळवी, सर उदय कुलथे सर, सोनाली सोनवणे मॅडम, अनुरथ तिडके सर, प्रवीण मोरे सर, नागेश जाधव अविनाश शिरस्कर कपिल masi सर यांचेही सहकार्य होते.

सन्मान, गुणगौरव आणि उत्कृष्ट सांस्कृतिक कार्यक्रम सोहळा 1 नोव्हेंबर 2026 रोजी पार पडला.

 

You may have missed