बाणेर, ३१ ऑक्टोबर २०२५ :
अमोल बालवडकर फाउंडेशनच्या वतीने राबविण्यात आलेल्या “मिशन निर्मल” स्वच्छता अभियानांतर्गत २८, २९ आणि ३० ऑक्टोबर रोजी बाणेर परिसरातील विविध सोसायट्या, गल्ली-बोळ आणि सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता करण्यात आली.
दि. २८ व २९ ऑक्टोबर रोजी राम इंदू पार्क लेन क्रमांक १ ते ७, तसेच ट्युलिप गार्डन, मेरीगोल्ड अपार्टमेंट, अलायन्स बिलेयर, नक्षत्र बंगला, उपाध्ये बंगला, पॅराडिग्म एमराल्ड, आराधना स्किल्स, आदित्य हेरिटेज, साईराम सर्व्हिसेस, गायकवाड रो हाऊस, श्रीराम शुभश्री बंगला, बेरी अव्हेन्यू बंगला, सायकर उद्यान इत्यादी ठिकाणी स्वच्छता मोहिम राबविण्यात आली.
तद्वतच, ३० ऑक्टोबर रोजी सृष्टी पार्क, शिवनेरी पार्क, आराध्या लेन, लक्ष्मी निवास, भगवती आयरिस, गौरव रेसिडेन्सी, गॅमेलिया, समृद्धी, जगताप हाइट्स, पर्ल बंगला, फेलिसिया, स्कायलाइट अपार्टमेंट्स, वृंदावन बंगला, परीस ॲकॅडमी, बाणेर एक्झिक्युटिव्ह हॉटेल आदी ठिकाणांची स्वच्छता करण्यात आली.
या उपक्रमात स्थानिक नागरिक, स्वयंसेवक आणि तरुण वर्गाने उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. “स्वच्छ परिसर – सुंदर परिसर” या घोषवाक्याला मूर्त रूप देत सर्वांनी परिसर स्वच्छतेबाबत जागरूकतेचा संदेश दिला.
अमोल बालवडकर फाउंडेशनच्या या उपक्रमाचे नागरिकांकडून कौतुक करण्यात आले. स्वच्छतेबरोबरच नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देत, बाणेर परिसरात “मिशन निर्मल” अभियानाने स्वच्छतेची नवी दिशा दिली आहे.



More Stories
बालेवाडीत कचरा समस्येवर मोरेश्वर बालवडकर यांचे सहाय्यक आयुक्तांना निवेदन; १५ दिवसांत उपाय न झाल्यास आंदोलनाचा इशारा
नसरापूर येथील चिमुरडीवरील अत्याचाराच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडीचा मेणबत्ती मोर्चा
गायनातून भाव व्यक्त होणे अत्यावश्यक : पं. उपेंद्र भट सोमेश्वर फाउंडेशनतर्फे २४ व्या ‘पुणे आयडॉल- 2026’ स्पर्धेचे उद्घाटन