बालेवाडी :
भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक बांधणीमध्ये केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि कॅबिनेट मंत्री नामदार चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली २०१७ पासून सातत्याने सक्रिय असणारे शिवम बालवडकर यांना भाजप युवा मोर्चा संपर्कप्रमुख, पुणे शहर म्हणून नवीन जबाबदारी देण्यात आली आहे.
भाजप युवा मोर्चा पुणे शहर अध्यक्ष दुष्यंत मोहोळ यांच्या हस्ते ही नियुक्ती जाहीर करण्यात आली. शिवम बालवडकर यांनी २०१७ पासून यापूर्वी भाजप विद्यार्थी मोर्चा सरचिटणीस, भाजप युवा वॉरियर्स अध्यक्ष, तसेच भाजप युवा मोर्चा उपाध्यक्ष म्हणून कार्य करत पक्ष संघटनात उल्लेखनीय योगदान दिले आहे.
नवीन जबाबदारी मिळाल्यानंतर शिवम बालवडकर यांनी पक्ष नेतृत्वाचे आभार मानत सांगितले की, “पक्षाने माझ्यावर दाखवलेला विश्वास मी शंभर टक्के कामातून सार्थ ठरवेन. युवा वर्गाला भाजपच्या विकासवादी विचारधारेत सहभागी करून घेणे हे माझे प्रमुख ध्येय राहील.”


More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी