म्हाळुंगे :
म्हाळुंगे गावातील सामाजिक, धार्मिक आणि व्यावसायिक कार्यात अग्रेसर असलेल्या प्रगतशील शेतकरी कुटुंबातील श्री. विनायक शिवाजी चिव्हे यांनी नुकताच भारतीय जनता पक्षात प्रवेश करून प्रभाग क्रमांक ९ मध्ये निवडणूक लढविण्याची तयारी दर्शवली आहे. त्यांच्या पक्षप्रवेशानंतर भाजपा कोथरूड उत्तर मंडळात त्यांना चिटणीस पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
श्री. विनायक चिव्हे हे मूळचे शेतकरी व व्यावसायिक असून, त्यांनी आपल्या कार्यकुशलतेमुळे आणि जनसंपर्कामुळे स्थानिक पातळीवर एक सक्षम नेतृत्व म्हणून ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या सोबत पत्नी सौ. प्रियांका विनायक चिव्हे, ज्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा पूर्ण केला आहे, त्या देखील सामाजिक कार्यात सक्रीय आहेत.
चिव्हे कुटुंब हे एकत्रित शेतकरी कुटुंब असून, शेतीव्यवसायाबरोबर इव्हेंट आणि मंडप व्यवसायात देखील कार्यरत आहे. सामाजिक कार्यक्रम, धार्मिक उपक्रम आणि गावातील सार्वजनिक प्रश्नांमध्ये त्यांचा सहभाग कायम राहिला आहे.
विनायक यांचे वडील श्री. शिवाजी चिव्हे हे वारकरी संप्रदायाचे निष्ठावान सेवक असून, दरवर्षी पायी वारीत सहभाग घेतात. शिवाय गेली ३० वर्ष नांदेडकर दिंडी मध्ये अन्नदान सुद्धा करत आहेत. त्यांच्या सामाजिक व धार्मिक कार्यामुळे चिव्हे कुटुंबाला म्हाळुंगे गावात आदराचे स्थान प्राप्त झाले आहे.
भाजपमध्ये प्रवेशानंतर विनायक शिवाजी चिव्हे यांनी सांगितले की, “म्हाळुंगे आणि परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करण्याचा माझा संकल्प आहे. पक्षाने दाखवलेला विश्वास विकासाच्या रूपाने परत देईन.”
म्हाळुंगे परिसरात तरुण, ऊर्जावान आणि समाजाभिमुख नेतृत्व म्हणून विनायक शिवाजी चिव्हे यांच्या प्रवेशामुळे स्थानिक राजकारणात नवचैतन्य निर्माण झाले आहे.


More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी