पुणे :
२०१४ पासून सक्रिय राजकारणात कार्यरत असलेल्या पाषाण येथील युवा नेतृत्व रोहन कोकाटे यांची भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा पुणे शहर सरचिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
त्यांच्या सातत्यपूर्ण संघटनात्मक कामगिरीची दखल घेत महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री नामदार चंद्रकांत पाटील, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि पुणे शहर अध्यक्ष धीरज घाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे शहर युवा मोर्चा अध्यक्ष दुष्यंत मोहोळ यांनी ही नियुक्ती जाहीर केली.
रोहन कोकाटे यांनी आपल्या राजकीय प्रवासात विविध जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडल्या आहेत. त्यांनी भाजप युवा मोर्चा प्रभाग अध्यक्ष, भाजप विद्यार्थी आघाडी पुणे शहर उपाध्यक्ष, कोथरूड विधानसभा युवा मोर्चा सरचिटणीस, तसेच कोथरूड उत्तर मंडळ युवा मोर्चा अध्यक्ष म्हणून कार्य करत पक्ष संघटनेला बळकटी दिली आहे.
त्यांच्या कार्यतत्परतेमुळे पक्षातील वरिष्ठांनी त्यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना युवा मोर्चा शहर सरचिटणीसपदी नेमले आहे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही नियुक्ती विशेष महत्त्वाची ठरणार आहे.
या नियुक्तीमुळे पाषाण परिसरासह संपूर्ण पुणे शहरातील युवा कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, “पक्ष बांधणीसाठी आणि युवकांना संघटनेशी जोडण्यासाठी रोहन कोकाटे अधिक जोमाने कार्य करतील”, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.
निवडीबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना रोहन कोकाटे म्हणाले, “भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा पुणे शहर सरचिटणीस पदाची जबाबदारी मिळणे ही माझ्यासाठी सन्मानाची आणि प्रेरणादायी बाब आहे. पक्ष नेतृत्वाने दाखविलेल्या विश्वासाबद्दल मी मनःपूर्वक आभारी आहे.
माझ्या राजकीय प्रवासात मार्गदर्शन करणारे महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री नामदार चंद्रकांत पाटील, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, तसेच शहर अध्यक्ष आणि वरिष्ठ पदाधिकारी यांचे मी विशेष आभार मानतो.
यापुढेही पक्षाच्या विचारधारेनुसार युवकांना संघटनेशी जोडणे, सामाजिक आणि विकासात्मक उपक्रमांद्वारे युवा शक्तीला दिशा देणे हे माझे प्राथमिक ध्येय असेल. पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी मी पूर्ण ताकदीने कार्यरत राहीन,” अशी भावना रोहन कोकाटे यांनी व्यक्त केली.


More Stories
योगीराज पतसंस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप….
पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल, सूस येथे दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा भावस्पर्शी निरोपसमारंभ सोहळा संपन्न.
“शिक्षणाबरोबरच मूल्यसंस्कार घडले तरच विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल होते” – मा. आमदार शरद ढमाले