November 1, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

‘मिस अँड मिसेस हेरिटेज इंडिया २०२६’चा ऐतिहासिक सोहळा दिमाखात संपन्न!

बाणेर :

महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाचा आणि गड-किल्ल्यांच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचा अनोखा आविष्कार घडवणारा ‘मिस अँड मिसेस हेरिटेज इंडिया २०२६ – सीझन ५’ हा भव्य ऐतिहासिक फॅशन शो बाणेर येथील बंटारा भवन येथे उत्साहात संपन्न झाला. ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढाकारातून, महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक विभागाच्या सहकार्यातून आणि मृणाल्स एंटरटेनमेंट आणि लहू बालवडकर सोशल वेल्फेअर यांच्या यांच्या संयोजनातून या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

या विशेष सोहळ्यात युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट महाराष्ट्रातील ११ गड-किल्ल्यांसह अन्य १० ऐतिहासिक किल्ल्यांचा, अशा एकूण २१ किल्ल्यांचा गौरवशाली इतिहास फॅशनच्या माध्यमातून सादर करण्यात आला. स्पर्धकांनी पारंपरिक वेशभूषा, ऐतिहासिक संदर्भ आणि आकर्षक रॅम्प वॉकच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या ऐतिहासिक वैभवाचे प्रभावी दर्शन घडवले. ही संकल्पना मृणाल एंटरटेनमेंट च्या संस्थापिका मृणाल सुमित गायकवाड यांची होती.

या कार्यक्रमाला मा. चंद्रकांतदादा पाटील, ओमप्रकाश शेटे, संदीप मोहिते पाटील, सौजन्या निकम आणि प्रशांत जोशी यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

या स्पर्धेत रिद्धिमा पांडे, प्रिया पाटील, ऐश्वर्या कुमार, अनुपम विश्वकर्मा, प्रीणिता पाडळकर, दीप्ती पापरकर, अक्षया पिंजरकर आणि ऋग्वेदा निंबाळकर यांनी विजेतेपद पटकावले. तर जया पाठक, इंद्रायणी गांगुर्डे, अश्विनी थोरात आणि हर्षदा जाधव यांची हेरिटेज स्पर्धेच्या ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून निवड करून त्यांचा विशेष गौरव करण्यात आला.

स्पर्धेचे परीक्षण अभिनेता अभ्यंग कुवळेकर, मीनल टिपसे, मेघना कुंटे आणि हर्षा बनसोडे यांनी केले. तसेच अवधुत गांधी आणि गौरी वानरसे यांच्या दमदार लाइव्ह परफॉर्मन्सने कार्यक्रमात रंगत आणली. त्यांच्या सादरीकरणाला उपस्थित प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

या सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी सनीज वर्ल्ड, वैशाली भागोडिया, प्राची सिद्धिकी, जयेश पाटील,अनिकेत मेकओव्हर, सुहान ज्वेल्स, बिग एफएम, मिवा ज्वेलर्स, रीका फूड, वस्त्र वेड आणि तनु डिझायनर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच मयूरी पवार, रविना शाह, हर्षल मराठे आणि सुमित गायकवाड यांनी कार्यक्रमाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली.

या सोहळ्यास प्रकाशतात्या बालवडकर, सचिन पाषाणकर, गणेश कळमकर, लहू बालवडकर, राहुल कोकाटे, प्रमोद निम्हण, मोरेश्वर बालवडकर, अस्मिता करंदीकर, वंदना सिंग, सचिन दळवी, वैदेही बापट, स्वप्नाली सायकर, ज्योती कळमकर, निकिता माथाडे, अनिकेत चांदरे, स्मृती जैन आणि जागृती विचारे यांच्यासह विविध क्षेत्रांतील अनेक मान्यवर उपस्थित होते.

“आपली संस्कृती हीच आपली ओळख आहे. महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास आणि गड-किल्ल्यांचा समृद्ध वारसा फॅशनच्या माध्यमातून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवणे, तसेच महिलांना स्वतःचे कौशल्य, आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्त्व सादर करण्यासाठी प्रभावी व्यासपीठ उपलब्ध करून देणे, हा या स्पर्धेमागील मुख्य उद्देश आहे,” असे स्पर्धेच्या संकल्पनाकार मृणाल सुमित गायकवाड यांनी सांगितले.

ऐतिहासिक वारसा, मराठमोळी संस्कृती, महिला सक्षमीकरण आणि आधुनिक फॅशन यांचा अनोखा संगम घडवणाऱ्या ‘मिस अँड मिसेस हेरिटेज इंडिया २०२६’च्या या सोहळ्याने उपस्थितांची मने जिंकली. महाराष्ट्राच्या ऐतिहासिक वैभवाला आधुनिक व्यासपीठावरून राष्ट्रीय स्तरावर अधोरेखित करण्याचा महत्त्वपूर्ण प्रयत्न या निमित्ताने करण्यात आला.