October 27, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

बाणेर-बालेवाडी माहेश्वरी मंडळाचा भक्तिमय भजन जामिंग सोहळा उत्साहात!

पुणे :

कोजागिरी पौर्णिमेच्या मंगलमय पर्वावर बाणेर-बालेवाडी माहेश्वरी मंडळातर्फे आयोजित भजन जामिंग कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. दिशांत पारिक आणि त्यांच्या बँडच्या सुमधुर भजनांनी २०० हून अधिक सदस्य व पाहुणे भक्तिरसात तल्लीन झाले. कुटुंबीय व मुलांच्या सहभागामुळे संपूर्ण वातावरण आनंदमय झाले.

अध्यक्षा अर्चना जाजू, सचिव निधी राठी आणि खजिनदार भावना मोहता यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा यशस्वी झाला. कोअर कमिटीतील अभिश्री करवा, आरती धूत आणि पूजा राठी यांचे विशेष योगदान लाभले. संस्थापक अध्यक्षा कमला काबरा, माजी अध्यक्षा राधिका सिकची, नेहा मुंदडा, रजनी काबरा, पायल मंत्री आणि सर्व समिती सदस्यांच्या सहकार्याने कार्यक्रमाला भव्य स्वरूप प्राप्त झाले. भक्ती, एकता आणि आनंदाचा संगम ठरलेल्या या सोहळ्याबद्दल मंडळाने सर्व उपस्थितांचे आभार मानले.