बालेवाडी :
बालेवाडी परिसरातील ज्येष्ठ नागरिक, महिला आणि तरुणांना सकाळी व संध्याकाळी फिरण्यासाठी तसेच व्यायामासाठी मैदान उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी पुणे महानगरपालिकेकडे केली आहे. यासंदर्भात औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त गोविंद दांगट यांना नागरिकांच्या वतीने निवेदन देण्यात आले.
बालेवाडी परिसरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता नागरिकांना नियमित व्यायाम, चालणे आणि विरंगुळ्यासाठी पुरेशी मोकळी जागा उपलब्ध होणे आवश्यक आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला आणि तरुणांच्या आरोग्याच्या दृष्टीने मैदान उपलब्ध करून देण्याची गरज नागरिकांनी निवेदनाद्वारे मांडली.
या निवेदनानंतर झालेल्या चर्चेत सहाय्यक आयुक्त गोविंद दांगट यांनी गुरुवार, दिनांक २९ ऑक्टोबर रोजी सकाळी ६.३० वाजता मोझे कॉलेजजवळ पुणे महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांसह उपस्थित राहण्याचे मान्य केले आहे. यावेळी परिसरातील मैदानासंदर्भातील प्रश्न तसेच महापालिकेशी संबंधित इतर नागरी समस्यांबाबत चर्चा होणार आहे.
या वेळी शिरीष बापट, सुदर्शन जगदाळे, अरुणकुमार राणे, सुभाष येवरे, रमेश जांभुळकर, विनायक बयाणी यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.
दरम्यान, गुरुवारी सकाळी ६.३० वाजता मोझे कॉलेजजवळ होणाऱ्या या पाहणी व चर्चेसाठी बालेवाडी परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, तसेच आपल्या भागातील महापालिकेशी संबंधित अडचणी व समस्या मांडाव्यात, असे आवाहन नागरिकांच्या वतीने करण्यात आले आहे.


More Stories
*🌳 वनविभाग आणि पेरिविंकल बावधनचा हरित महायज्ञ’!* *एनडीएच्या वनक्षेत्रात ५ एकरांवर ३,००० देशी वृक्षांची लागवड; पर्यावरण संवर्धनासाठी विद्यार्थ्यांचा पुढाकार!*
बाणेर-बालेवाडी माहेश्वरी मंडळाचा भक्तिमय भजन जामिंग सोहळा उत्साहात!
जमीन वाद, मुदतठेवी आणि रोख व्यवहार; बाणेर भैरवनाथ देवस्थान ट्रस्टच्या कारभारावर प्रश्न