पुणे :
क्रीडाक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत चैतन्य विद्या प्रतिष्ठान संचलित पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, सुस शाखेने सुवर्ण, रौप्य आणि कांस्यपदकांचा त्रिवेणी संगम साधला आहे.* विभागीय स्तरावरील शालेय फेन्सिंग स्पर्धेत अत्मजा पाटील हिने सुवर्णपदक पटकावत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली, तर पुणे ग्रामीण जिल्हास्तरीय शालेय कराटे स्पर्धेत श्रेयस चव्हाण याने रौप्यपदक आणि अथर्व पवार याने कांस्यपदक जिंकून शाळेच्या क्रीडायशात मानाची भर घातली.
अहिल्यानगर येथे झालेल्या विभागीय स्तरावरील शालेय फेन्सिंग स्पर्धेत इयत्ता सहावीतील अत्मजा पाटील हिने १४ वर्षांखालील गटात सुवर्णपदक पटकावून आपल्या कौशल्याची चमक दाखवली. या उल्लेखनीय यशामुळे तिची जालना येथे होणाऱ्या राज्यस्तरीय फेन्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तिच्या या कामगिरीने पेरिविंकल सुस शाखेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
हिंजवडी येथे झालेल्या पुणे ग्रामीण जिल्हास्तरीय शालेय कराटे स्पर्धेतही पेरिविंकलच्या विद्यार्थ्यांनी दमदार कामगिरी केली. इयत्ता नववीतील श्रेयस चव्हाण याने १७ वर्षांखालील ४५ किलो वजनगटात रौप्यपदक, तर इयत्ता दहावीतील अथर्व पवार याने १७ वर्षांखालील ५५ किलो वजनगटात कांस्यपदक पटकावले. दोन्ही विद्यार्थ्यांनी आपल्या जिद्द, शिस्त आणि कौशल्याच्या जोरावर शाळेच्या क्रीडाक्षेत्रातील यशात मोलाची भर घातली.
तीन विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशामुळे पेरिविंकल सुस शाखेने क्रीडाक्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. विद्यार्थ्यांच्या मेहनतीला लाभलेले हे यश शाळेतील क्रीडासंस्कृती, सातत्यपूर्ण सराव आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी दिल्या जाणाऱ्या प्रोत्साहनाचे प्रतीक ठरले आहे.
या यशाबद्दल चैतन्य विद्या प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री. राजेंद्र बांदल सर, संचालिका सौ. रेखा बांदल, शिवानी बांदल, श्री. यश बांदल तसेच शाळेच्या प्राचार्या सौ. निर्मल पंडित, उपमुख्याध्यापिका सौ. योगिता ढाणे, शिक्षकवृंद आणि क्रीडाप्रशिक्षकांनी तिन्ही विद्यार्थ्यांचे विशेष अभिनंदन केले.
शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. निर्मल पंडित यांनी पेरीविंकलचा नावलौकिक हा हा केवळ शिक्षणातच नव्हे तर क्रीडाक्षेत्रात सुद्धा तालुक्यपूर्ती मर्यादित न राहता आता तो जिल्ह्यात देखील नावलौकिक झाला आहे असे सांगून या तिन्ही विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करत त्यांच्या पुढील क्रीडाप्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांच्या या यशामागे त्यांचे मार्गदर्शक व क्रीडाप्रशिक्षक श्री. ज्ञानेश्वर मोरे सर यांचेही मोलाचे योगदान असून, त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळाली, असे त्यांनी नमूद केले. अत्मजा पाटील हिला आगामी राज्यस्तरीय स्पर्धेसाठी विशेष शुभेच्छा देण्यात आल्या.
पेरिविंकल सुस शाखेच्या या दैदीप्यमान कामगिरीने शैक्षणिक गुणवत्तेसोबतच क्रीडाक्षेत्रातील उत्कृष्टतेची परंपरा अधिक बळकट केली आहे.



More Stories
*🌳 वनविभाग आणि पेरिविंकल बावधनचा हरित महायज्ञ’!* *एनडीएच्या वनक्षेत्रात ५ एकरांवर ३,००० देशी वृक्षांची लागवड; पर्यावरण संवर्धनासाठी विद्यार्थ्यांचा पुढाकार!*
बाणेर-बालेवाडी माहेश्वरी मंडळाचा भक्तिमय भजन जामिंग सोहळा उत्साहात!
बालेवाडीत ज्येष्ठ नागरिक, महिला व तरुणांसाठी मैदान उपलब्ध करून देण्याची मागणी