August 5, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

बालेवाडीत ‘द्वादश मल्हार दर्शन’चा भव्य अध्यात्मिक सोहळा! भारतातील १२ मार्तंड-मल्हार मंदिरांच्या पादुकांचे प्रथमच पुण्यात दर्शन – ३५,००० हून अधिक भाविकांची उपस्थिती

बालेवाडी :

लहू बालवडकर सोशल वेलफेअरच्या माध्यमातून दरवर्षी आयोजित केला जाणारा ‘द्वादश मल्हार पादुका आणि चैतन्यस्पर्श पादुकादर्शन’ सोहळा यंदा अपूर्व भक्तिभावात आणि भव्यदिव्य वातावरणात पार पडला. बालेवाडी हायस्ट्रीट मैदानावर झालेल्या या सोहळ्यात पुणेकरांनी भावना, श्रद्धा आणि अध्यात्मिक ऊर्जा यांचा अनोखा संगम अनुभवला.

 

१२ मार्तंड–मल्हार देवस्थानांच्या पादुकांचे ऐतिहासिक पुण्यदर्शन

या कार्यक्रमात भारतातील बारा प्रमुख मार्तंड–मल्हार देवस्थानांच्या पवित्र पादुका प्रथमच पुण्यात एकत्र आणण्यात आल्या.

श्री क्षेत्र जेजुरी (पुणे),
श्री क्षेत्र खंडोबा पाल (सातारा),
श्री क्षेत्र मार्तंड देव मंगळसुळी (बेळगाव),
श्री मलातेश स्वामी देवरगुड्डा (कर्नाटक),
श्री मैलारा लिंगेश्वर (मैलार, कर्नाटक),
श्री मैलारपूर स्वामी (मैलारपूर, कर्नाटक),
श्री क्षेत्र खंडोबा (मालेगाव, नांदेड),
अणदूर (धाराशिव),
सातारा (छत्रपती संभाजीनगर),
शेगूड (अहिल्यानगर),
निमगाव खेड—

या सर्व देवस्थानांतील पगडी, घोडा आणि पादुका पुण्यात आल्याने भाविकांत प्रचंड उत्साह पाहायला मिळाला.

१२ संत, महंत व शक्तिपीठांच्या पवित्र पादुका

सोहळ्यात भारतातील विविध शक्तिपीठे, संत-समाधी स्थळे आणि महंतांच्या पादुकादेखील पुण्यात प्रदर्शित करण्यात आल्या यात…

• प्राचीन श्री दत्त सुवर्णमूर्ती
• श्री नृसिंह सरस्वती नारायण पादुका – श्री क्षेत्र औदुंबर
• श्री दत्त गुरु करुणा पादुका – कडगंची, कर्नाटक
• श्री ज्ञानेश्वर महाराज पादुका – नेर्लेकर घराण्याची प्रासादिक पादुका
• संत तुकाराम महाराज – भंडारा डोंगर येथील पादुका
• श्री मच्छिंद्रनाथ महाराज पादुका – मच्छिंद्रनाथ गड, सावरगाव
• समर्थ रामदास स्वामी पादुका – मोहन बुवा रामदासी, खातगाव
• श्री स्वामी समर्थ महाराज पादुका – सुंदराबाई काडगावकर (सन 1866)
• ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज – भागीरथीबाई यांना दिलेल्या पादुका (1879)
• श्री गजानन महाराज पादुका – भगवानराव देशमुख (1907)
• श्री वासुदेवानंद सरस्वती (टेंबे) स्वामी महाराज
• श्री शंकर महाराज पादुका – पेंटर काका (1946)

या सर्व पादुका पुण्यात एकत्र आल्याने भाविकांच्या भक्तिभावात भर पडली.

३५,००० हून अधिक भाविकांचा सहभाग

या दिव्य दर्शनाचा लाभ घेण्यासाठी दिवसभरात ३५,000 पेक्षा अधिक भाविकांनी उपस्थित राहून दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेतला.

मा. चंद्रकांतदादा पाटील यांची उपस्थिती महाआरतीने सोहळ्याला तेज, सोहळ्याला राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आणि कोथरूडचे कार्यक्षम आमदार मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी विशेष उपस्थिती दर्शवली. त्यांच्या हस्ते महाआरती पार पडली आणि त्यांनी भाविकांना शुभेच्छा दिल्या. या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष दैदिप्यमान स्वरूप प्राप्त झाले.

यावेळी कोथरूड भाजपा उत्तर मंडलचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दिवसभर भक्तिरसाने भारावलेलं वातावरण

सोहळ्यात दिवसभर विविध भक्तिमय कार्यक्रमांनी भाविकांना मंत्रमुग्ध केले

• जागरण- गोंधळ
• भजनी मंडळांचे सादरीकरण
• वाद्यांची जुगलबंदी
• चंदन कांबळे यांचा ‘स्वर मल्हार’

यामुळे भक्तिभावाची अनुभूती अनेकपटींनी वाढली.

दर्शन, महाप्रसाद आणि पुण्यनगरीचा अध्यात्मिक उत्सव

सकाळी १० ते रात्री १० या वेळेत दर्शन आणि महाप्रसाद सुरू होते. पुणे, बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुतारवाडी, सोमेश्वरवाडी, सुस आणि महाळुंगे परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.

*लहू गजानन बालवडकर यांची प्रतिक्रिया*

भक्तांच्या उपस्थितीने आणि त्यांच्या श्रद्धेने कार्यक्रम यशस्वी झाला. खंडोबांच्या या अभूतपूर्व दर्शनामुळे पुणेकरांना एक अनोखा अध्यात्मिक अनुभव मिळाला.

खंडोबाभक्त, वारकरी समाज आणि अध्यात्मप्रेमींसाठी हा सोहळा पुण्यनगरीच्या अध्यात्मिक दिनदर्शिकेत नोंदला जाणारा एक संस्मरणीय पर्व ठरला.

 

You may have missed