February 4, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

पाषाण येथे भव्य रक्तदान शिबिरात ४६७ रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या वाढदिवसानिमित्त सरचिटणीस युवा मोर्चा पुणे शहर श्री रोहन कोकाटे व सौ ऐश्वर्या कोकाटे यांचा उपक्रम

पाषाण :

केंद्रीय राज्यमंत्री व पुण्यनगरीचे खासदार मुरलीधर (अण्णा) मोहोळ यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा पुणे शहर, कोकाटे तालीम मंडळ ट्रस्ट आणि कृष्णगंगा सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पाषाण येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. युवा मोर्चा सरचिटणीस पुणे शहर श्री रोहन कोकाटे व ऐश्वर्या कोकाटे यांच्या पुढाकारातून आयोजित या उपक्रमाला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत ४६७ रक्तदात्यांनी रक्तदान करून अण्णा मोहोळ यांना अनोख्या पद्धतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

थॅलेसिमिया रुग्णांसाठी अत्यंत आवश्यक असलेल्या रक्तपुरवठ्यास हातभार लावण्यासाठी हे शिबिर विशेषतः आयोजित करण्यात आले होते. समाजोपयोगी कार्यातून वाढदिवस साजरा करण्याचा आदर्श या उपक्रमातून घालण्यात आला.

या कार्यक्रमाला , ह.भ.प. शांताराम महाराज निम्हण,संतसेवक मारुती कोकाटे, ह भ प पंढरीनाथ कोकाटे, ह भ प बबन भेगडे ,प्रकाश बालवडकर पुणे शहर सरचिटणीस पुनीत जोशी, माजी नगरसेविका ज्योती कळमकर, प्रल्हाद सायकर, माजी नगरसेवक सनी निम्हण, भाजप नेते सचिन पाषाणकर, गणेश कळमकर, संजय निम्हण, सचिन दळवी, मोरेश्वर बालवडकर, शिवम बालवडकर, राहुल कोकाटे, सुरेश अण्णा कोकाटे कोकाटे, दत्ता अण्णा कोकाटे, कालिदास कोकाटे, रोहिदास कोकाटे, शिवाजी कोकाटे, भास्कर कोकाटे, पवन कोकाटे, पांडुरंग कोकाटे, संजय कोकाटे, केशव कोकाटे, काळूराम कोकाटे, नारायण कोकाटे, प्रदीप कोकाटे,प्रमोद कांबळे,प्रवीण आमले, चंद्रकांत जाधव, हरिश्चंद्र कोकाटे, सौरभ कोकाटे, संग्राम कोकाटे, दत्ता कोकाटे, अमित शिंदे, शरद कोकाटे, मिलिंद कोकाटे आदी मान्यवरांनी उपस्थित राहून रक्तदात्यांचे कौतुक केले.

रक्तदात्यांच्या सहभागामुळे शिबिर अत्यंत यशस्वी ठरले असून आयोजकांनी सर्वांचे मनापासून आभार मानले.