बाणेर :
अजिंक्य पार्क सोसायटी परिसरात पुणे महानगरपालिकेचे मा. स्थायी समिती अध्यक्ष बाबुरावजी चांदेरे यांच्या नेतृत्वाखाली सिमेंट काँक्रीटीकरण रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन विधिवत पार पडले. या महत्त्वपूर्ण उपक्रमामुळे परिसरातील रहिवाशांना दैनंदिन वाहतुकीत होणाऱ्या अडचणींमधून दिलासा मिळणार असून रस्त्यांची गुणवत्ता मोठ्या प्रमाणात सुधारण्यास मदत होणार आहे.
रस्त्याच्या कामाच्या शुभारंभानंतर परिसरातील पायाभूत सुविधा अधिक सक्षम, सुकर व सुरक्षित होण्यास हातभार लागेल. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या विविध विकासकामांना चांदेरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली गती मिळत असून स्थानिक नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहर उपाध्यक्ष राहुलदादा बालवडकर, राष्ट्रवादी काँग्रेस शहर युवक अध्यक्ष समीर चांदेरे तसेच अजिंक्य पार्क सोसायटीतील रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते. रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर परिसराचा विकास व वाहतूक व्यवस्था अधिक चांगली व सुरक्षित होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.




More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी