*पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचा अथर्वशीर्ष पठण सोहळ्यात विक्रमी सहभाग!!*
पुणे :
श्री गणेशोत्सवानिमित्त पुण्यातील सुप्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या सामूहिक अथर्वशीर्ष पठण सोहळ्यात चैतन्य विद्या प्रतिष्ठान संचलित पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या सुस, बावधन आणि पिरंगुट शाखेतील इयत्ता ६ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला.
या कार्यक्रमासाठी पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष माननीय श्री. राजेंद्र बांदल सर, संचालिका सौ. रेखा बांदल, संचालिका कु. शिवानी बांदल, संचालक श्री. यश बांदल, प्रमुख प्राचार्या सौ. निर्मल पंडित यांची प्रमुख उपस्थिती होती.
पहाटे ५ वाजता मंदिर परिसरात अथर्वशीर्ष पठणाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यासाठी विद्यार्थ्यांना घेऊन सुमारे १५ बसेस पहाटे ४ वाजता विविध शाखांमधून रवाना झाल्या. सुस शाखेतील ५०० विद्यार्थी, पिरंगुट शाखेतील १५० विद्यार्थी आणि बावधन शाखेतील १०० विद्यार्थी, तसेच सर्व शाखांतील सुमारे १०० शिक्षकांनी या भक्तिमय उपक्रमात सहभाग घेतला.
सर्व विद्यार्थी मंदिर परिसरात एकत्रित जमल्यानंतर त्यांचे स्वागत करण्यात आले. भक्तिमय आणि प्रसन्न वातावरणात विद्यार्थ्यांनी सामूहिक अथर्वशीर्ष पठण केले. पहाटेच्या शांत वातावरणात गणरायाच्या सान्निध्यात केलेले पठण हा विद्यार्थ्यांसह शिक्षकांसाठीही अत्यंत प्रसन्न, शांत आणि अविस्मरणीय अनुभव ठरला. कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांना प्रसादाचेही वाटप करण्यात आले.
पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स गेल्या पाच वर्षांपासून या अथर्वशीर्ष पठण सोहळ्यात सातत्याने सहभागी होत असून, या भक्तिमय उपक्रमातील संस्थेचा सहभाग ही एक अभिमानाची परंपरा बनली आहे. या सातत्यपूर्ण सहभागाला मागील वर्षी विशेष गौरवाची जोड मिळाली. मागील वर्षीच्या अथर्वशीर्ष पठण सोहळ्यात पुणे शहरातील विजेती शाळा म्हणून पेरिविंकलची निवड करण्यात आली होती. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल महापौर सौ. मंजुषा नागपुरे आणि विभागीय आयुक्त सौ. शीतल तेली यांच्या हस्ते पारितोषिक प्रदान करण्यात आले होते. त्यामुळे यंदाच्या सोहळ्यातील सहभागाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
या वर्षीच्या सोहळ्यात एकूण १५ शाळांनी सहभाग नोंदविला होता. त्यामध्ये पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सने सर्वाधिक विद्यार्थी सहभाग नोंदवत उल्लेखनीय कामगिरी केली. पेरिविंकलच्या या भव्य सहभागाची विशेष दखल घेत संस्थेला सहभागपत्र प्रदान करण्यात आले. दगडूशेठ गणपती ट्रस्टचे प्रमुख माननीय श्री. सुनील रासने तसेच माननीय श्री. सूर्यवंशी सर यांच्या हस्ते हे सहभागपत्र संस्थेच्या प्रमुख प्राचार्या निर्मल पंडित यांना प्रदान करण्यात आले.
विशेष म्हणजे, मागील वर्षी विजेतेपदाचा मान मिळवल्यानंतर सलग दुसऱ्या वर्षीही पेरिविंकलने सर्वाधिक विद्यार्थी सहभाग नोंदविला आहे. पाच वर्षांचा सातत्यपूर्ण सहभाग, मागील वर्षीचे विजेतेपद आणि यंदाचा विक्रमी सहभाग यामुळे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरातील या भक्तिमय सोहळ्यात पेरिविंकलची उपस्थिती विशेष ठरली.
संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन हे शाळेच्या प्राचार्या सौ निर्मल पंडित मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली व मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजन व समन्वयासाठी सूस शाखेचे H.O.D सचिन खोडके, उपमुख्याध्यापिका सौ योगिता ढाणे, तसेच पिरंगुट शाखेच्या मुख्याध्यापिका इनायत मुजावर, श्रीमती नेहा मालवडे (इन-चार्ज, सुस शाखा), कु. सयाली गायकवाड (इन-चार्ज, बावधन शाखा), शिरीन काझी (इन-चार्ज, बावधन शाखा) तसेच पिरंगुट शाखेच्या पर्यवेक्षिका सना इनामदार, पल्लवी नारखेडे व रुपाली गर्ग यांचे विशेष सहकार्य लाभले.
या संपूर्ण अथर्वशीर्ष पठणासाठी विद्यार्थांचा सराव करून घेण्यासाठी संस्कृत शिक्षक प्रणव महाजन यांनी विशेष परिश्रम घेतले.
भक्ती, संस्कार आणि सामाजिक-सांस्कृतिक सहभागाची परंपरा जपत पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सने श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणरायाच्या चरणी पुन्हा एकदा आपल्या एकजुटीचे, संघभावनेचे आणि संस्कारक्षम शिक्षणाचे दर्शन घडविले.






More Stories
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी
*‘भक्तीचा उत्सव, पर्यावरणाची जपणूक!’ — पेरिविंकल बावधनमध्ये विद्यार्थ्यांनी साकारल्या Eco-Friendly गणेशमूर्ती!!*