पुणे :
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासोबतच क्रीडा क्षेत्रालाही प्रोत्साहन देणाऱ्या चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या बावधन व सुस शाखेतील विद्यार्थ्यांनी मुळशी तालुकास्तरीय आंतरशालेय तायक्वांदो स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला. श्री श्री रविशंकर विद्यामंदिर, भुंगाव येथे दि. १९ सप्टेंबर २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत पेरिविंकलच्या खेळाडूंनी उत्कृष्ट तांत्रिक कौशल्य, चपळता, आत्मविश्वास, शिस्त आणि जिद्दीचे दर्शन घडवत चार सुवर्णपदके व एका रौप्यपदकाची कमाई केली.
स्पर्धेत बावधन शाखेतील दीप बाडेकर याने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत सुवर्णपदक पटकावले. स्वरन्या नायडू हिनेही आपल्या गटात दमदार कामगिरी करत सुवर्णपदक मिळविले, तर अदिती धर्मावत हिने आत्मविश्वासपूर्ण खेळ करत रौप्यपदकावर नाव कोरले. या खेळाडूंनी सामन्यादरम्यान दाखविलेली चपळता, अचूक तंत्र आणि शेवटपर्यंत लढण्याची वृत्ती उपस्थितांचे लक्ष वेधून घेतली.
सुस शाखेतील इयत्ता आठवीचा विद्यार्थी देवांश तपकीर याने ४२ किलो वजनी गटातील १४ वर्षांखालील श्रेणीत प्रभावी कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले. तांत्रिक कौशल्य, वेगवान हालचाली आणि आत्मविश्वासाच्या जोरावर त्याने प्रतिस्पर्ध्यांचा सामना केला.
या उल्लेखनीय कामगिरीमुळे सर्व सुवर्ण पदक विजेत्या विद्यार्थ्यांची म्हणजेच देवांश तापकीर , दीप बडेकर व स्वरान्या नायडू यांची २८ सप्टेंबर २०२६ रोजी आंबेगाव येथे होणाऱ्या विभागीय तायक्वांदो स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तालुकास्तरावरून विभागीय स्तरावर पोहोचण्याची ही संधी त्याच्या क्रीडा प्रवासातील महत्त्वपूर्ण टप्पा मानली जात आहे.
विद्यार्थ्यांच्या या यशामागे त्यांचा नियमित सराव, कठोर मेहनत आणि प्रशिक्षकांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. कोच सूरज साठे सर आणि मुळशी तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत पेरिविंकलच्या खेळाडूंची दमदार कामगिरी खरोखरच अभिमानास्पद ठरली आहे.
यशामागे विद्यार्थ्यांची मेहनत आणि सातत्यपूर्ण सराव यांसोबतच बावधन शाखेचे कोच सूरज साठे सर आणि सूस शाखेचे कोच ज्ञानेश्वर मोरे सर यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. विद्यार्थ्यांना तायक्वांदोचे तांत्रिक बारकावे समजावून देतानाच नियमित सराव, शारीरिक तंदुरुस्ती, शिस्त, आत्मसंयम आणि स्पर्धात्मक दृष्टिकोन यावर त्यांनी विशेष भर दिला.
खेळाडूंच्या क्षमतेनुसार प्रशिक्षण देत त्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी प्रशिक्षकांनी घेतलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे शाळेच्या वतीने कौतुक करण्यात आले. “प्रशिक्षणातील सातत्य आणि विद्यार्थ्यांची मेहनत यांचा योग्य संगम झाल्यास क्रीडा क्षेत्रात निश्चितच उत्तम परिणाम साधता येतात,” अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
व्यवस्थापनाकडून अभिनंदन
पेरिविंकलच्या विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल चैतन्य विद्या प्रतिष्ठानचे संस्थापक माननीय अध्यक्ष श्री. राजेंद्र बांदल सर, संचालिका सौ रेखा बांदल, कु. शिवानी बांदल तसेच शाळेच्या प्रमुख प्राचार्या सौ निर्मल पंडित यांनी विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन केले.
हेड प्रिन्सिपल सौ निर्मल पंडित यांनी विद्यार्थ्यांचे, प्रशिक्षकांचे, शिक्षकांचे व पालकांचे कौतुक करताना सांगितले की, विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासामध्ये क्रीडेला महत्त्वाचे स्थान आहे. खेळामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, नेतृत्वगुण, आत्मविश्वास, संघभावना आणि आव्हानांना सामोरे जाण्याची क्षमता विकसित होते. शैक्षणिक प्रगतीसोबतच विविध क्रीडा प्रकारांमध्ये विद्यार्थ्यांना संधी देण्याचा शाळेचा सातत्यपूर्ण प्रयत्न असल्याचे त्यांनी नमूद केले.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल पालक, शिक्षक आणि पेरिविंकल परिवारातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, देवांश तपकीरच्या आगामी विभागीय स्पर्धेतील कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
तालुकास्तरावर पदकांची मिळविलेली ही कामगिरी पेरिविंकलच्या क्रीडा संस्कृतीला बळ देणारी असून, “सराव, शिस्त, जिद्द आणि आत्मविश्वास” या मूल्यांवर विश्वास ठेवून युवा खेळाडूंची ही यशस्वी वाटचाल पुढेही सुरू राहणार आहे.



More Stories
रणवीर हनुमान तरुण मंडळ वरची तालीम औंध मंडळ वतीने १११ वर्ष निमित्ताने आयोजित बाल चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*