September 10, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

वसुंधरा अभियानाच्या २०व्या वर्धापनदिनानिमित्त राजाभाऊ गुडदे फाउंडेशनचा सन्मान

बालेवाडी :

वसुंधरा अभियान, बाणेर यांच्या २०व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सामाजिक व पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या राजाभाऊ गुडदे फाउंडेशनचा सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमाला वसुंधरा अभियानाचे सर्व सदस्य, राजाभाऊ गुडदे फाउंडेशनचे सदस्य तसेच अनेक पर्यावरणप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी वसुंधरा अभियानाच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या वृक्षसंवर्धन व पर्यावरण संरक्षणाच्या कार्याचे कौतुक करण्यात आले.

पर्यावरणाचे संवर्धन, वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धनासाठी वसुंधरा अभियान करत असलेल्या सातत्यपूर्ण कार्याबद्दल राजाभाऊ गुडदे फाउंडेशनच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले. तसेच फाउंडेशनचा सन्मान केल्याबद्दल राजाभाऊ गुडदे फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ. किरण गुडदे यांनी वसुंधरा अभियानाचे मनःपूर्वक आभार मानले.

“पर्यावरण संवर्धनासाठी वसुंधरा अभियानासारख्या संस्थांसोबत काम करण्याची संधी मिळणे ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. भविष्यातही पर्यावरण रक्षणासाठी आम्ही सातत्याने कार्यरत राहू,” असे किरण गुडदे यांनी यावेळी सांगितले.

कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.