September 7, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

तुकाई टेकडी येथे वसुंधरा अभियान बाणेर संस्थेचा 20 वा वर्धापन दिन साजरा 

बाणेर :

वसुंधरा अभियान बाणेर या संस्थेचा 20 वा वर्धापन दिन अतिशय उत्साहात, आनंदात, कौटुंबिक वातावरणात पार पडला .

 

तूकाई टेकडी बाणेर या ठिकाणी सन 2006 पासून लावलेल्या रोपाचा आता मोठा वटवृक्ष झाला असून , महाराष्ट्र शासनाने श्री शिवछत्रपती वनश्री पुरस्कार देऊन संस्थेला सन्मानित केलेले आहे..

संस्थेने आत्तापर्यंत 60,000 पेक्षा अधिक झाडे लावून ओसाड टेकडीचे जैवविविधता युक्त जंगलामध्ये रूपांतर केलेले आहे..

पाणी आडवा~ पाणी जिरवा या अंतर्गत ,सलग समतल चर, बंधारे निर्मिती केली आहे ..

दररोज दोन ते तीन तास अविरतपणे ,अखंडपणे काम करणारी संस्था असून, त्याचेच फळ म्हणून, आज बाणेर टेकडी हिरवीगार झाल्याचे आपल्याला दिसून येते..

या वटवृक्षाच्या 20 वर्षांच्या वाटचालीचा वर्धापन दिन सोहळा कुंदन मंगल कार्यालय या ठिकाणी आयोजित केला होता… वर्धापन दिन सोहळ्यामध्ये मागील सर्व वर्षांचा आढावा घेऊन, वेगवेगळ्या माध्यमातून जी कामे चालतात त्याची उपस्थिती त्यांना माहिती देण्यात आली..

वर्धापन दिनाच्या निमित्ताने वेगवेगळ्या सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या संस्थांचा देखील सन्मान करण्यात आला यामध्ये राजाभाऊ गूडदे फाउंडेशन चे सर्व विश्वस्त तसेच राजा शिवछत्रपती परिवार या गड संवर्धन करणाऱ्या शिलेदारांचा, तसेच गरुड झेप अंतर्गत आग्रा ते राजगड ही मोहीम यशस्वीपणे पार पडणार्या या शिलेदारांचा सन्मान वसुंधरा संस्थेतर्फे करण्यात आला…
उपस्थित सदस्यांनी मनोगते व्यक्त करून वसुंधरा हरितकार्यास शुभेच्छा दिल्या..

याप्रसंगी बोलताना रवीजी घाटे यांनी वसुंधराच्या कामाचे कौतुक केले आणि सामुदायिक नेतृत्वामुळे संस्था अग्रेसर होत आहे याचा आनंद व्यक्त केला.. भविष्यातील नियोजना संदर्भात मार्गदर्शन केले

*वर्षभर केलेल्या कामाचे स्वरूप, टेकडीवर चालणारी विविध कामे, भविष्यातील नियोजन आणि आर्थिक ताळेबंद या संबंधी सर्व माहिती उपस्थितांना देण्यात आली.*.