पुणे :
शिक्षक हा भावी पिढीचा शिल्पकार असून त्याच्याकडून आपल्याला ज्ञान व जगाकडे पहाण्याची सकारात्मक दृष्टी मिळते* असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे कार्यवाह व *माजी मुख्याध्यापक विष्णू मोरे* यांनी केले.
महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या *एरंडवणा माध्यमिक विद्यालयात* भारताचे दुसरे राष्ट्रपती भारतरत्न डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनी शिक्षक दिन अत्यंत उत्साहात, आनंदी व सांस्कृतिक वातावरणात पार पडला.
शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थिनींनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस अभिवादन करून आपल्या शिक्षकांप्रती कृतज्ञता व आदर व्यक्त केला. विद्यार्थिनींनी शिक्षकांची भूमिका स्वीकारून विविध वर्गांमध्ये अध्यापनाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. या अनुभवाने विद्यार्थिनी हरवून गेल्याचे पहायला मिळाले. त्यांच्यात कमालीचा आत्मविश्वास निर्माण झाल्याचे दिसले. विद्यार्थिनींनी वर्गात आलेले अध्यापन अनुभव कथन केले.
याप्रसंगी मुख्याध्यापक कृष्णकांत केंगार, सांस्कृतिक विभाग प्रमुख पुष्पलता बनसुडे, हंगामी विद्यार्थी मुख्याध्यापिका स्नेहल कांबळे, उपमुख्याध्यापिका श्रावणी पवार, पर्यवेक्षिका सलोनी खेडेकर, दादा लोणकर, मानसी खरे,दत्तात्रय चौगुले, समृद्धी सराफ, रीना माने, सायली कुलकर्णी, रूपाली मातेरे, राजेंद्र सोंडकर, अनिल देवकर व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक हंगामी मुख्याध्यापिका स्नेहल कांबळे हिने तर आभार सलोनी खेडेकर हिने मानले. सूत्रसंचालन समीक्षा लोंढे या विद्यार्थिनीने केले. शिक्षक दिनाचे औचित्य साधून अभ्यास /कला/ क्रीडा क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या विद्यार्थिनींना डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम बेस्ट स्टुडन्ट एक्सलन्स अवॉर्ड देऊन स्नेहसंमेलन कार्यक्रमाच्या वेळी गौरविण्यात येणार आहे.




























More Stories
तुकाई टेकडी येथे वसुंधरा अभियान बाणेर संस्थेचा 20 वा वर्धापन दिन साजरा
*शाडू मातीपासून चिमुकल्यांनी साकारला पर्यावरणपूरक बाप्पा**-औंध-बोपोडीत ‘इको-फ्रेंडली गणेशमूर्ती कार्यशाळेला’ उत्स्फूर्त प्रतिसाद*
*AIच्या साथीने विचारांची उंच भरारी; ब्राम्हण महासंघ आयोजित वक्तृत्व स्पर्धेत पेरिविंकल स्कूल ठरले प्रथम क्रमांकाचे मानकरी!*