पुणे :
देशप्रेमासाठी कार्य करण्याची आणि दहशतवादाविरोधात न्यायालयात खटला उभा करण्याची संधी मिळाली, हे माझे भाग्य आहे, असे प्रतिपादन खासदार तथा ज्येष्ठ विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांनी केले.
राहुल बालवडकर मित्र समूहाच्या वतीने २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यावर आधारित ‘प्रहार’ चित्रपटाच्या विशेष प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या विशेष प्रदर्शनाला अॅड. उज्ज्वल निकम यांनी उपस्थिती लावत प्रेक्षकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी देशासाठी काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल अभिमान व्यक्त केला.
या प्रसंगी प्रेक्षकांच्या वतीने डीआयजी महेश्वर रेड्डी, सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त अजय कदम आणि सेवानिवृत्त उत्पादन शुल्क अधीक्षक मोहन वर्दे यांच्या हस्ते अॅड. उज्ज्वल निकम यांचा गौरव करण्यात आला.
‘प्रहार’ चित्रपटातून २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याची पार्श्वभूमी आणि दहशतवादाविरोधातील लढा प्रभावीपणे मांडण्यात आला आहे. चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षकांमध्ये देशाप्रती अभिमान आणि राष्ट्रनिष्ठेची भावना अधिक दृढ झाल्याचे पाहायला मिळाले. चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर उपस्थित प्रेक्षकांनी ‘भारत माता की जय’ अशा देशभक्तिपर घोषणा देत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
प्रेक्षकांच्या या उत्स्फूर्त प्रतिक्रियांमुळे अॅड. उज्ज्वल निकम यांनी आनंद व्यक्त केला. देशप्रेम, दहशतवादाविरोधातील संघर्ष आणि राष्ट्रनिष्ठेचा संदेश देणाऱ्या या विशेष प्रदर्शनाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद लाभला. राहुल बालवडकर मित्र समूहाच्या या उपक्रमातून देशभक्तीची भावना जागृत करण्याचा प्रयत्न करण्यात आला.


More Stories
बालेवाडी ते कस्पटेवाडी वाकडला जोडणाऱ्या व पुणे महानगरपालिकेच्या हलगर्जीपणामुळे रखडलेल्या पुलाची दसऱ्याच्या मुहूर्तावर पूजा करून स्वाभिमानी पक्षाने व्यक्त केला निषेध!
*पारंपरिक वेशभूषा, भोंडल्याची गाणी अन् लोकसंस्कृतीचा जागर! पेरीविंकल स्कूल, पिरंगुटमध्ये भोंडला उत्सव उत्साहात साजरा!!*
महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा स्तुत्य उपक्रम, सुनेत्रावहिनी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त तीन महिलांना ई-पिंक रिक्षांची भेट..