पुणे :
स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या स्मृतीस अभिवादन करून, त्यांच्या प्रेरणेने आणि मा. सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त महिला सक्षमीकरणाच्या उद्देशाने तीन महिलांना ई-पिंक रिक्षांचे वितरण करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहराध्यक्ष मा. सुनील आण्णा टिंगरे यांच्या विशेष प्रयत्नातून हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमामुळे महिलांना स्वावलंबी होण्याची आणि रोजगाराच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम बनण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्ष सौ. वैशाली ताई नागवडे, राष्ट्रीय सचिव (क्रीडा व सांस्कृतिक विभाग) मा. अभिषेक दादा बोके, पुणे महानगरपालिका गटनेते ॲड. निलेशजी निकम आणि स्वीकृत नगरसेवक राकेशजी कामठे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या उपक्रमांतर्गत सविता केंद्रे, कोमल रावल आणि सोनल शेंडगे या तीन महिला लाभार्थींना ई-पिंक रिक्षांचे वितरण करण्यात आले. महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविणे आणि समाजात आत्मविश्वासाने उभे राहण्यासाठी प्रोत्साहन देणे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.
पुणे शहर युवती कार्याध्यक्ष अमृता रानवडे यांनी या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले. यावेळी सपना राऊत, शीतल येनपुरे, श्रेया तांबे, वामिका जगताप, निकिता जगताप, श्वेता मिस्त्री, अर्चना वाघमारे, साक्षी खवले, नूतन गायकवाड, बाळासाहेब आहेर, राहुल तांबे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
महिलांना केवळ मदतीचा हात देण्यापुरते मर्यादित न राहता, त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी रोजगाराची साधने उपलब्ध करून देणे महत्त्वाचे आहे. ई-पिंक रिक्षा वितरणाचा हा उपक्रम महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरत आहे.


More Stories
*पारंपरिक वेशभूषा, भोंडल्याची गाणी अन् लोकसंस्कृतीचा जागर! पेरीविंकल स्कूल, पिरंगुटमध्ये भोंडला उत्सव उत्साहात साजरा!!*
*पेरीविंकल बावधन व सुस शाखेत दांडियाच्या ठेक्यावर थिरकले विद्यार्थी, पालक अन् शिक्षक; ‘दांडिया ईव्ह २०२६’चा बावधन व सूस नगरीत जल्लोष!*
“*विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि मुलींच्या सक्षमीकरणासाठी पेरिविंकल स्कूलमध्ये ‘सखी सावित्री समिती’ची बैठक उत्साहात संपन्न* !”