पौड, ता. १६ :
चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या पेरीविंकल इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या पौड शाखेत शुक्रवार, दि. १६ ऑक्टोबर २०२६ रोजी शारदीय नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. नवरसांचे महत्त्व, मानवी जीवनातील त्यांचे स्थान आणि जीवनातील विविध प्रसंगांना धैर्याने सामोरे जाण्याची प्रेरणा या संकल्पनेवर आधारित कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आले.
या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रशालेचे अध्यक्ष राजेंद्र बांदल, संचालिका शिवानी बांदल, रेखा बांदल, उदयोन्मुख संचालक यश बांदल, शाखाप्रमुख निर्मल पंडित, मुख्याध्यापिका वीणा कदम आणि पर्यवेक्षिका नेत्रा काकडे यांच्या उपस्थितीत सरस्वती पूजनाने करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी सादर केलेला संगीतमय गरबा आणि त्यांनी लावलेले चविष्ट खाद्यपदार्थांचे स्टॉल हे कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले. तसेच नऊ देवींच्या रूपातील विद्यार्थिनींच्या आकर्षक वेशभूषेने उत्सवाची शोभा द्विगुणित केली. पारंपरिक वेशभूषा, संगीत आणि उत्साहपूर्ण वातावरणामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता.
विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव देण्याबरोबरच भारतीय संस्कृती आणि परंपरांची ओळख करून देणारा हा उत्सव उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशालेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.



More Stories
खडकवासला धरणातील दूषित पाण्याचा मुद्दा महापालिकेत गाजला; महापौर-आयुक्तांना वॉटर प्युरिफायर भेट
*“पुस्तकांशी मैत्री, ज्ञानाशी नाते!” — डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त पेरिविंकल स्कूलमध्ये वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा*
*पेरीविंकलच्या बावधन व सुस शाखेत वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा!!*