सुस, बावधन :
भारताचे माजी राष्ट्रपती, थोर शास्त्रज्ञ आणि विद्यार्थ्यांचे प्रेरणास्थान भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त १५ ऑक्टोबर रोजी साजऱ्या होणाऱ्या वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून चैतन्य विद्या प्रतिष्ठान संचलित पेरीविंकल इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या सुस व बावधन शाखांमध्ये विविध प्रेरणादायी उपक्रमांच्या माध्यमातून वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
दोन्ही शाखांमध्ये आयोजित विशेष सभेत डॉ. कलाम यांच्या प्रतिमेला अभिवादन करून त्यांच्या प्रेरणादायी जीवनकार्याचे स्मरण करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी पुस्तक वाचन केले, वाचनाचे महत्त्व अधोरेखित करणारी भाषणे सादर केली तसेच नियमित वाचन करण्याची प्रतिज्ञा घेतली. या उपक्रमांतून विद्यार्थ्यांमध्ये पुस्तकांविषयी आवड निर्माण करणे, ज्ञानाची गोडी वाढविणे आणि वाचनाची सवय दैनंदिन जीवनाचा भाग बनविणे हा संदेश देण्यात आला.
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे जीवन संघर्ष, जिद्द, ज्ञान आणि देशसेवेचे प्रेरणादायी उदाहरण आहे. साध्या परिस्थितीतून पुढे येत त्यांनी विज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले आणि भारताचे राष्ट्रपती म्हणून देशाची सेवा केली. विद्यार्थ्यांवर त्यांचे विशेष प्रेम होते. प्रत्येक विद्यार्थ्याने मोठी स्वप्ने पाहावीत, ज्ञान मिळविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावेत आणि देशाच्या प्रगतीत योगदान द्यावे, हा त्यांचा संदेश आजही तितकाच महत्त्वाचा आहे.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी पुस्तक वाचनातून मिळणारे ज्ञान, वाचनामुळे होणारा शब्दसंग्रहाचा विकास, भाषिक कौशल्यांमध्ये होणारी वाढ, एकाग्रता आणि विचारशक्तीचे महत्त्व आपल्या भाषणांतून प्रभावीपणे मांडले याचे कौतुक करत केवळ परीक्षेपुरते न वाचता कथा, चरित्रे, विज्ञानविषयक पुस्तके आणि प्रेरणादायी साहित्य यांचे नियमित वाचन करण्याचे महत्त्वही शाळेच्या प्राचार्या यांच्याकडून अधोरेखित करण्यात आले. आजच्या डिजिटल युगात मोबाईल आणि इतर इलेक्ट्रॉनिक साधनांच्या वाढत्या वापरामुळे पुस्तक वाचनाची सवय कमी होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांनी पुस्तकांशी मैत्री करणे, दररोज काही वेळ वाचनासाठी राखून ठेवणे आणि मिळविलेले ज्ञान प्रत्यक्ष जीवनात उपयोगात आणणे आवश्यक आहे, हा महत्त्वपूर्ण संदेश शाळेच्या प्राचार्या सौ निर्मल पंडित यांच्या भाषणातून विद्यार्थ्यांना देण्यात आला.
यावेळी विद्यार्थ्यांनी नियमितपणे पुस्तके वाचण्याची, वाचनातून ज्ञान मिळविण्याची आणि इतरांनाही वाचनासाठी प्रेरित करण्याची प्रतिज्ञा घेतली. या प्रतिज्ञेमुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाविषयी सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्याबरोबरच ज्ञानसमृद्ध आणि विचारशील व्यक्तिमत्त्व घडविण्याचा संकल्प दृढ झाला.
पेरीविंकल स्कूलच्या सुस व बावधन शाखांनी आयोजित केलेल्या या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड, आत्मविश्वास, अभिव्यक्ती कौशल्य आणि ज्ञानाची ओढ वाढविण्याचा प्रयत्न करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक ज्ञानाबरोबरच वाचन संस्कृती आणि जीवनमूल्यांची जोपासना करणे महत्त्वाचे असल्याचा दृष्टिकोन या उपक्रमातून अधोरेखित झाला.
या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन शाळेच्या प्राचार्या सौ. निर्मल पंडित यांच्या अध्यक्षतेखाली व मार्गदर्शनाखाली करण्यात आले. उपमुख्याध्यापिका सौ. योगिता ढाणे तसेच समन्वयक सौ. सायली गायकवाड व सौ. शिरीन काझी यांच्या नेतृत्वाखाली सर्व शिक्षकवृंद आणि विद्यार्थी यांच्या सक्रिय सहकार्याने हा कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध, नियोजनपूर्वक आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
“पुस्तके वाचा, विचार समृद्ध करा आणि ज्ञानाच्या बळावर उज्ज्वल भविष्य घडवा!” हा संदेश देत पेरीविंकलच्या बावधन व सुस
शाखांमध्ये वाचन प्रेरणा दिन उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला.



More Stories
*“पुस्तकांशी मैत्री, ज्ञानाशी नाते!” — डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त पेरिविंकल स्कूलमध्ये वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा*
पुणेकरांच्या पिण्याच्या पाण्याचे संरक्षण करा,खडकवासला धरण परिसरात सांडपाणी रोखण्यासाठी कठोर उपाययोजनांची गरज : नगरसेवक अमोल बालवडकर
*द टाइम्स ऑफ इंडिया आणि ESFE चा मानाचा स्टार एज्युकेशन अवॉर्ड – 2026 पुरस्कार विष्णू मोरे यांना प्रदान.*