पुणे :
द टाइम्स ऑफ इंडिया व Education Supply & Franchise Expo ( ESFE) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मुंबई येथील गोरेगाव (पूर्व) प्रसिद्ध नेस्को सेंटर येथे पार पडलेल्या दिमाखदार सोहळ्यात देशभरातून आलेल्या शिक्षणतज्ज्ञ, विचारवंत, वरिष्ठ संचालक व मुख्याध्यापक यांची मोठी उपस्थिती होती. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या विद्यापीठ हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक विष्णू मोरे यांच्या 2025-2026 मधील कार्याची दखल घेऊन संपूर्ण गुणवत्तेच्या कठोर निकषावर आधारित *स्टार एज्युकेशन अवॉर्ड-2026 बेस्ट प्रिन्सिपल इन पुणे* या पुरस्कारासाठी नाव जाहीर करण्यात आले. तेव्हा उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडात त्यांच्या कर्तुत्वाचा, कार्याचा गौरव केला.
मोरे सरांनी केलेल्या शैक्षणिक, सामाजिक व पर्यावरण विषयक कार्याची दखल घेऊन *स्टार एज्युकेशन अवॉर्ड 2026 बेस्ट प्रिन्सिपल इन पुणे.* पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
आतापर्यंत मोरे सरांनी पुणे महानगरपालिका, पुणे जिल्हा माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ,भूगोल शिक्षक संघ पुणे, लायन्स क्लब ऑफ पुणे आनंद, पद्मश्री डॉ. मणिभाई देसाई मानव सेवा ट्रस्ट यांच्यातर्फे *गुणवंत शिक्षक पुरस्कार* तर मुख्याध्यापक संघातर्फे *गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार* देऊन सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन स्टार एज्युकेशन अवॉर्ड सलग तिसऱ्या वर्षी त्यांना प्रदान करण्यात आला. राष्ट्रीय स्तरावरील सन्मानाची मोहोर त्यांच्यावर उमटली आहे.



More Stories
*मुळशीतील माले ग्रामपंचायतीच्या कारभारावर गंभीर आरोपांचा बॉम्ब!**माले ग्रामपंचायतीतील कारभाराची जिल्हाधिकाऱ्यांकडून सखोल चौकशीचे आदेश!*
*पेरिविंकल इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज च्या, सुस शाखेचे कराटे स्पर्धेत सुवर्णयश!*
*सज्जनगडावर पेरिविंकल स्कूलच्या पिरंगुट शाखेच्या विद्यार्थ्यांची स्वच्छता मोहीम !! ऐतिहासिक ज्ञानासह स्वच्छतेचा संदेश..*