पिरंगुट :
चैतन्य विद्या प्रतिष्ठान संचलित पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पिरंगुट येथे *भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम* यांच्या जयंतीनिमित्त १५ ऑक्टोबर २०२६ रोजी ‘वाचन प्रेरणा दिन’ उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात स्वागत व प्रास्ताविकाने झाली. त्यानंतर सरस्वती पूजन आणि भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. यावेळी शिक्षकांनी वाचनाचे महत्त्व अधोरेखित करणारी भाषणे केली, तसेच प्रेरणादायी कवितांचे सादरीकरण करून कार्यक्रमात साहित्यिक रंग भरला.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी वाचलेल्या पुस्तकांबद्दल आपले अभिप्राय व्यक्त केले. पुस्तकांमधून मिळणारे ज्ञान, त्यातून विकसित होणारी विचारशक्ती आणि वाचनामुळे समृद्ध होणारे व्यक्तिमत्त्व यांविषयी त्यांनी आपले विचार मांडले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना पुस्तकांचे महत्त्व जाणून घेण्याची आणि वाचनाची आवड जोपासण्याची प्रेरणा मिळाली.
जागतिक हात स्वच्छता दिनानिमित्त शिक्षकांनी विद्यार्थ्यांना हात धुण्याची योग्य पद्धत प्रात्यक्षिकाद्वारे समजावून सांगितली आणि हातांच्या स्वच्छतेचे आरोग्याच्या दृष्टीने असलेले महत्त्व अधोरेखित केले. विद्यार्थ्यांनी या उपक्रमात उत्साहाने सहभाग घेतला आणि *“स्वच्छ हात, निरोगी जीवन”* हा संदेश आपल्या कुटुंबात व समाजात पोहोचवण्याचा संकल्प केला.
चैतन्य विद्या प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. राजेंद्र बांदल, संचालिका सौ. रेखा बांदल आणि संचालिका कु. शिवानी बांदल , संचालक यश बांदल , सर्व शाखाप्रमुख सौ. निर्मल पंडित यांच्या शैक्षणिक दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांमध्ये ज्ञानाची आवड, वाचनसंस्कृती आणि सर्जनशील विचार रुजविणाऱ्या उपक्रमांना नेहमीच प्रोत्साहन मिळते.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा साहित्यिक व शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करणे ही शाळेची महत्त्वपूर्ण परंपरा आहे.
शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. इनायत मुजावर यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना नियमित वाचन करण्याचे, पुस्तकांमधून नवनवीन ज्ञान मिळवण्याचे आणि डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या विचारांपासून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले.
मुख्याध्यापिका सौ. इनायत मुजावर, पूर्व प्राथमिक विभागप्रमुख सौ. पल्लवी नारखेडे, प्राथमिक विभागप्रमुख सौ. सना इनामदार आणि माध्यमिक विभागप्रमुख सौ. रुपाली गर्ग, शिक्षकवृंद यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
वाचन ही केवळ सवय नसून ज्ञान, कल्पनाशक्ती आणि यशाकडे नेणारी गुरुकिल्ली आहे , हा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.



More Stories
*पेरीविंकलच्या बावधन व सुस शाखेत वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा!!*
पुणेकरांच्या पिण्याच्या पाण्याचे संरक्षण करा,खडकवासला धरण परिसरात सांडपाणी रोखण्यासाठी कठोर उपाययोजनांची गरज : नगरसेवक अमोल बालवडकर
*द टाइम्स ऑफ इंडिया आणि ESFE चा मानाचा स्टार एज्युकेशन अवॉर्ड – 2026 पुरस्कार विष्णू मोरे यांना प्रदान.*