बाणेर :
अखिल न्यू बाणेर मित्र मंडळ व व्यापारी संघटना बाणेर यांच्या वतीने आयोजित ‘साम्राज्य ग्रुप दहीहंडी उत्सव २०२६’ मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. सालाबादप्रमाणे यंदाही विविध दहीहंडी पथकांनी आपल्या कलेचे आणि साहसाचे थरारक प्रात्यक्षिक सादर करून उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली.
यंदाच्या दहीहंडी उत्सवाला ‘साहसी खेळ’ म्हणून विशेष स्वरूप देण्यात आले. यामध्ये भैरवनाथ मित्र मंडळ, शिरवळ आणि सहयोग मित्र मंडळ, चेंबूर या दोन पथकांनी चुरशीने पाच-पाच थर रचत आपल्या कौशल्याचे दर्शन घडविले. तसेच मराठा गोविंदा पथक आणि चाराई नागरी गोविंदा पथक यांनी तब्बल सात थर लावत उपस्थितांची मने जिंकली. गोविंदा पथकांच्या या थरारक प्रात्यक्षिकांना उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली.
उत्सवाचे विशेष आकर्षण म्हणजे बाणेर परिसरातील ज्येष्ठ नागरिकांचा करण्यात आलेला सन्मान. ‘खरे स्टार हेच आहेत’ या भावनेतून परिसरातील ज्येष्ठ नागरिकांना विशेष निमंत्रित करून त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी गोपाळ भक्तांनी ‘गोपाल कृष्ण भगवान की जय’ अशा घोषणा देत ज्येष्ठ नागरिकांच्या सन्मानाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
याशिवाय परिसरातील उल्लेखनीय कामगिरी करणारे खेळाडू, सामाजिक क्षेत्रात चांगले काम करणारे नागरिक तसेच शासकीय कर्मचारी यांचाही सन्मान करण्यात आला.
सर्व आवश्यक नियमांचे पालन करत दहीहंडी उत्सव उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मंडळाचे अध्यक्ष प्रकाश मुकुंद तापकीर, उपाध्यक्ष मंदार पोरे, कार्याध्यक्ष विनायक चिव्हे, यांच्यासह अक्षय तापकीर, पंकज तापकीर, वैभव तापकीर, ओमकार तापकीर, गौरव तापकीर, जयेश तापकीर, मनोज पोळ, बापू बनसोडे, विशाल भगत आणि सागर शिंदे यांनी परिश्रम घेतले.





























More Stories
*दातृत्वाची भावना प्रत्येकामध्ये रुजावी, एकल मातांना मदतीचा प्रस्ताव शासनस्तरावर विचाराधीन – ना. चंद्रकांतदादा पाटील यांचे प्रतिपादन*
*पेरिविंकलच्या प्रगतीची खरी ताकद शिक्षक; सहा शाखांचा एकत्रित शिक्षक दिन सोहळा उत्साहात!!!*
सुसगावमध्ये आज दहीहंडी उत्सव निमित्त श्री कानिफनाथ महाराज पुरस्कार वितरण सोहळा..