पाषाण :
पाषाण परिसरातील पाणीपुरवठ्याची अनियमितता दूर करण्यासाठी माजी नगरसेवक प्रमोद निम्हण यांच्या प्रयत्नातून कॉसमॉस चौक ते चौधरी आळी या भागात नव्या पिण्याच्या पाण्याच्या लाईनचे काम सुरू करण्यात आले असून, या कामाचे भूमिपूजन माजी नगरसेविका सुषमा निम्हण यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
या नव्या पाईपलाईनमुळे पाण्याचा दाब, उपलब्धता आणि वितरण व्यवस्थेत मोठी सुधारणा होणार असून शेकडो नागरिकांना दिलासा मिळणार आहे. स्थानिक रहिवाशांनी या उपक्रमाचे स्वागत करत दिलासा व्यक्त केला.
कार्यक्रमाला स्थानिक नागरिक, मान्यवर व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यात जेष्ठ ज्ञानोबा नाना निम्हण, सोपान भाऊ निम्हण, विटकर काका, संजय आप्पा निम्हण, राजु शेठ गलांडे, भारत पवार, सत्यजित चौधरी, झेंडे काका, संदिप जाधव आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
पाषाण परिसरातील मूलभूत सुविधांचा विकास, पायाभूत सोयींचे उभारणीकरण आणि नागरिकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचे या प्रसंगी माजी नगरसेविका सुषमा निम्हण यांनी सांगितले. आगामी काळातही परिसरातील गरजा ओळखून अधिक विकासकामे राबवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.



More Stories
*बावधन च्या पेरीविंकल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये सोनक टोयोटाच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण जनजागृती व वृक्षारोपण अभियान उत्साहात संपन्न!!!*
*ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सखी-सुखदाचा आनंदोत्सव उत्साहात साजरा*
“वीज सडक पाणी” प्रश्न, बालेवाडी वेलफेअर फेडरेशनने मांडला महाराष्ट्राच्या मंत्रालयात.