सुतारवाडी :
हिंदुहृदयसम्राट प्रबोधनकारांचे सुपुत्र व शिवसेनाप्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या १३व्या स्मृतिदिनानिमित्त सुतारवाडी–पाषाण येथील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शाखा व सनशाइन प्री स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाला विभाग संघटिका सौ. स्वातीताई जनार्दन रणपिसे, शिवदूत कोथरूड विधानसभा महेश भीमराव सुतार, शाखाप्रमुख अमोल अनिल फाले तसेच सनशाइन प्री स्कूलचे विद्यार्थी उपस्थित होते.
या वेळी बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्याचे स्मरण करून त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा समाजापर्यंत पोहोचवण्याचा संकल्प व्यक्त केला. लहानग्या विद्यार्थ्यांनीही पुष्पांजली अर्पण करून कार्यक्रमात आपला सहभाग नोंदवला.
स्मृतिदिनानिमित्त सुतारवाडी–पाषाण परिसरात श्रद्धा, आदर आणि शिवसेनेच्या विचारांची प्रेरणा देणारे वातावरण निर्माण झाले.



More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी