पुणे :
महाराष्ट्र शासनाने राज्यासाठी सुधारित युवा धोरण तयार करण्यासाठी स्थापन केलेल्या उच्चस्तरीय समितीत विशेष निमंत्रित सदस्य म्हणून पुण्यातील युवक कार्यकर्ते सनी विनायक निम्हण यांची निवड करण्यात आली आहे.
शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे. आमदार संग्राम जगताप पत्रकार विनोद राऊत आणि पत्रकार भगवान परब यांचाही या समितीत समावेश आहे.
सनी निम्हण हे पुणे महानगरपालिकेतील माजी नगरसेवक असून, सोमेश्वर फाउंडेशनच्या माध्यमातून विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवितात. राज्यातील युवकांसाठी सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा, उद्योग आणि स्वयंरोजगार या विविध क्षेत्रांत सातत्याने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे निम्हण यांची या समितीत विशेष निमंत्रित म्हणून निवड करण्यात आली. युवा विकासासंबंधी धोरणात्मक स्तरावर काम करणाऱ्या या समितीत निम्हण यांचा सहभाग महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
या नियुक्तीबद्दल प्रतिक्रिया देताना सनी विनायक निम्हण म्हणाले, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच राज्याचे क्रीडामंत्री मधुकर कोकाटे यांनी दाखविलेला विश्वास मी सार्थ ठरवेन. युवक धोरण म्हणजे राज्याच्या भविष्यासाठी दिशा देणारे दस्तऐवज असून त्यात काम करण्याची संधी मिळणे ही माझ्यासाठी मोठी जबाबदारी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मी यासाठी विशेष आभार मानतो.”
सनी विनायक निम्हण यांच्या समावेशामुळे युवकांच्या विविध गरजा, रोजगार संधी, कौशल्यविकास, सामाजिक सहभाग आणि क्रीडा प्रोत्साहन या क्षेत्रांवर समिती अधिक प्रभावीपणे काम करेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.



More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी