बावधन :
बावधन (बु.) परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेचा व सार्वजनिक सोयींचा गंभीर प्रश्न स्थानिक पातळीवर वेगाने पुढे येत असताना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुणे शहराचे उपाध्यक्ष माजी उपसरपंच दिपक दगडे यांनी पुढाकार घेत PMRDA आयुक्त योगेश म्हसे यांच्या कडे अधिकृत निवेदन सादर केले आहे.
स्थानिक भागात अनेक सोसायट्यांमध्ये असलेले अॅमेंनिटी प्लॉट्स दुर्लक्षित अवस्थेत पडून असून तेथे वाढणाऱ्या झाडाझुडपांमुळे नागरीकांच्या जीवितास धोका निर्माण होत आहे. याबाबत त्वरित उपाययोजना करण्याची मागणी दिपक दगडे यांनी आपल्या निवेदनातून आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांच्याकडे केली.
दगडे यांनी सुचवले आहे की, हे अॅमेंनिटी प्लॉट्स नागरिकांच्या उपयोगासाठी गार्डन, Nana-Nani पार्क, खेळाचे मैदान व विविध सामाजिक उपक्रमांसाठी विकसित करण्यात यावेत. परिसरातील वाढती लोकसंख्या आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने या सुविधा अत्यावश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
परिसरातील नागरिकांकडून या उपक्रमाचे स्वागत होत असून माजी उपसरपंच दिपक दगडे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे लवकरच सकारात्मक निर्णय होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी