सुस :
सुस परिसरातील वाढत्या वाहतूक कोंडीच्या समस्येबाबत सुसचे उपसरपंच तथा भाजप युवा मोर्चा, कोथरूड उत्तर मंडळाचे अध्यक्ष अनिकेत चांदेरे यांनी वाहतूक पोलीस विभाग, बावधन यांना निवेदन दिले.
या निवेदनात सुस येथील शिवबा चौक व तापकीर वस्ती येथील छत्रपती संभाजी महाराज चौक येथे सकाळी व सायंकाळी वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी किमान दोन वाहतूक पोलीस अधिकारी व वाहतूक वॉर्डन नियुक्त करण्याची मागणी करण्यात आली.
सुस परिसरात वाढती लोकसंख्या, वाढते वाहनांचे प्रमाण आणि अपुरी वाहतूक यंत्रणा यामुळे नागरिकांना दररोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. विशेषतः शाळकरी विद्यार्थी, नोकरदार, ज्येष्ठ नागरिक तसेच रुग्णवाहिकांनाही याचा फटका बसत आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा व सोयीचा विचार करून तातडीने आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून वाहतूक व्यवस्था सुरळीत करावी, अशी मागणी अनिकेत चांदेरे यांनी निवेदनाद्वारे केली


More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी