March 17, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

पेरिविंकल शाळेच्या बावधन शाखेच्या अंगणातून उज्ज्वल भविष्यासाठी – इयत्ता १० वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांचा भावस्पर्शी निरोप समारंभ उत्साहात संपन्न!!!

बावधन :

चैतन्य विद्या प्रतिष्ठान च्या पेरिविंकल इंग्लीश मिडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज च्या बावधन शाखेत शुक्रवार दि.३०जानेवारी २०२६ रोजी इ.१०वी व १२ वी च्या विद्यार्थांच्या सन २०२५-२६ या बॅचचा निरोपसमारंभाचा कार्यक्रम अत्यंत उत्साहात व थाटात संपन्न झाला.

दरवर्षीच्या ठरलेल्या शालेय प्रथेप्रमाणे इयत्ता ९वी व ११वी च्या विद्यार्थ्यांनी इयत्ता १०वी व १२वी च्या सर्व विद्यार्थ्यांना पारंपरिक औक्षण करून विद्यार्थ्यांसाठी या खास निरोपसमारंभाचे आयोजन केले होते.

कार्यक्रमाचा शुभारंभ पारंपरिक सरस्वती पूजनाने व दीपप्रज्वलनाने करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कोथरूड बावधनच्या नवनिर्वाचित नगरसेविका सौ. अल्पनाताई वर्पे, कोथरूडच्याच नगरसेविका सौ. रुपालीताई पवार, सूस पाषाण भागाच्या नवनिर्वाचित नगरसेविका, सौ मयुरीताई कोकाटे, भारतीय जनता पार्टीचे नेते गणेशजी वर्पे, स्वीकृत नगरसेवक वैभवजी मुरकुटे, RPI चे उमेश कांबळे यांच्या समवेत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री राजेंद्रजी बांदल, संचालिका सौ रेखा बांदल, कुमारी शिवानी बांदल ,शाळेच्या मुख्याध्यापिका सौ निर्मल पंडित आदी मान्यवर उपस्थित होते.

शाळेच्या अगदी प्रवेश द्वारापासूनच सर्व मान्यवरांचे व सर्व विद्यार्थ्यांचे अत्यंत उत्साहात व थाटात स्वागत करण्यात आले होते. सर्व मान्यवरांच्या हस्ते १० वी व १२वी च्या सर्व विद्यार्थ्यांना शाळेकडून आठवण म्हणून भेटवस्तू प्रदान करून विद्यार्थ्याचे कौतुक करण्यात आले.

यावेळी शाळेतर्फे उपस्थित प्रमुख पाहुण्यांचे पुष्पगुच्छ, शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
त्यानंतर विद्यार्थ्यांनी शाळेबद्दल व शिक्षकांबद्दलचे त्यांचे मनोगत व्यक्त करून आपल्या भावनांना वाटमोकळी करून दिली.आनंद व दुःख या दोन्ही संमिश्र भावना व शिक्षकांप्रती असलेला आदर विद्यार्थ्यांनी व्यक्त केला. तसेच इ.१०वी व १२वी च्या वर्गशिक्षिका यांनी देखील विद्यार्थ्यांप्रती असलेली आत्मयीता व्यक्त करून परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.

संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री राजेंद्र बांदल सर यांनी ” गुरूंच्या प्रती कायम विश्वास ठेवला तर अर्ध यश त्यातच मिळाल्यासारखे आहे ” हे एका सुंदर कथेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पटवून दिले. आपल्या शिक्षणाचा व ज्ञानाचा उपयोग नेहमी देशसेवेसाठी, समाजसेवेसाठी व्हायला हवा,”असा मोलाचा संदेश सर्व विद्यार्थ्यांना जीवनाच्या पेपर मध्ये यशस्वी होऊन उंच शिखर गाठा व शाळेचे व पालकांचे नाव उज्वल करा असा मोलाचा संदेश सर्व विद्यार्थ्यांना देऊन आज बसलेल्या सर्व मान्यवरांचा आदर्श ठेऊन उद्या अनेक मान्यवर या शाळेमधून निर्माण होतील व लाल दिव्याच्या गाडीमधून उतरतील ,असा विश्वास आपल्या मनोगतातून व्यक्त करत सर्व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

प्रमुख पाहुण्या सौ अल्पनाताई वर्पे यांनी देखील आपल्या मनोगतातून आजच्या निरोप समारंभाचे, विद्यार्थ्यांचे, मुख्याध्यापक व शिक्षकांचे मनापासून कौतुक केले, आणि “परत एकदा विदयार्थी होऊन या शाळेचा एक भाग बना” व तुमच्या शिक्षकांचे, शाळेचे व पालकांची मान उंचावेल असे काहीतरी करा असे प्रतिपादन केले.

तसेच आजच्या या कार्यक्रमाला लाभलेल्या प्रमुख पाहुण्या रुपालीताई पवार यांनी सर्व विद्यार्थ्यांना अत्यंत मोलाची शिकवण दिली की, “विद्यार्थ्यांनी आपल्या अंगी कावळया सारखी_ तीक्ष्ण नजर , बगळयासारखी_ एकाग्रता व श्र्वानासारखी _सतर्कता हे गुण अंगीकारले पाहिजेत.” दैनंदिन आयुष्यातील अल्पाहाराचे व संस्कारांचे महत्त्व सांगून सर्वांना भावी परीक्षेसाठी व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

नगरसेविका व आजच्या प्रमुख पाहुण्या सौ मयुरीताई कोकाटे यांनी देखील सर्वांना शुभेच्छा देऊन सराव व प्रयत्न हे जीवनाचे मुख्य पैलू असून यशाने हुरळून न जावे व अपयशाने खचून न जाता सातत्य ठेऊन प्रसंगाला समोर जावे असे त्यांच्या भाषणात सांगितले.

प्रमुख पाहुण्या सौ अल्पनाताई वर्पे यांनी देखील आपल्या मनोगतातून आजच्या निरोप समारंभाचे, विद्यार्थ्यांचे, मुख्याध्यापक व शिक्षकांचे मनापासून कौतुक केले, आणि “परत एकदा विदयार्थी होऊन या शाळेचा एक भाग बना” व तुमच्या शिक्षकांचे, शाळेचे व पालकांची मान उंचावेल असे काहीतरी करा असे प्रतिपादन केले.

या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन शाळेच्या मुख्याध्यापिका सौ निर्मल पंडीत यांच्या अध्यक्षतेखाली पर्यवेक्षक तसेच टीम लीडर राजश्री थोरात व स्वाती कोल्हे यांच्या सह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी , इयत्ता ९ वी व ११ वी च्या विद्यार्थ्यांच्या सहकार्याने अत्यंत शिस्तबद्ध पध्तीने करण्यात आले होते. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. ऋचा हल्लूर यांनी केले होते.

 

You may have missed