बावधन :
चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज, बावधन येथे ७७ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात व देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी मा. श्री. बाळासाहेब मोरे सर (निवृत्त तांत्रिक अधिकारी, DRDO), मा. श्री. अविनाश परासकर सर (टीम लीडर, बॉबस्ट इंडिया प्रा. लि.), मा. श्री. संदीप ढमढेरे तसेच शाळेच्या संचालिका शिवानी राजेंद्र बांदल आदी मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या उत्स्फूर्त स्वागताने झाली. त्यानंतर ध्वजपूजन व ध्वजारोहण करण्यात आले. सर्वांनी अभिमानाने राष्ट्रगीत व ध्वजगीत गायले. यानंतर संविधान प्रतिज्ञा घेण्यात आली व संविधानाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले.
विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या देशभक्तीपर गीतांनी वातावरण भारावून टाकले. शिस्त, एकात्मता व समन्वय यांचे उत्तम दर्शन घडवणारा मार्चपास्ट विशेष आकर्षण ठरला.
यावेळी मास्टर वेद मारणे याने जर्मन भाषेत प्रजासत्ताक दिनावरील भाषण सादर केले. या उपक्रमातून पेरिविंकल शाळा विद्यार्थ्यांना जागतिक भाषा शिकवून भविष्यासाठी कशी सज्ज करते, हे ठळकपणे अधोरेखित झाले.
प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी सादर केलेले योग पिरॅमिड हे भारतीय संस्कृती, शारीरिक क्षमता, लवचिकता व शिस्त यांचे सुंदर मिश्रण होते. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या देशभक्तीपर नृत्याने खऱ्या अर्थाने देशप्रेमाची भावना प्रकट केली.
कार्यक्रमात संचालिका मा. कु. शिवानी बांदल मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रत्येक विद्यार्थ्याने यशस्वी नागरिक बनून देशाच्या प्रगतीसाठी योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. आजचे विद्यार्थी हे उद्याचे भारताचे भविष्य असून विविध क्षेत्रांत ते नक्कीच देशाचे नाव उज्वल करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
प्रमुख अतिथी मा. श्री. बाळासाहेब मोरे सर यांनी विद्यार्थ्यांशी अतिशय मोकळेपणाने संवाद साधला. त्यांनी DRDO मधील कार्य, क्षेपणास्त्रे व संशोधनाच्या संधी यांची माहिती देऊन देशसेवेचे महत्त्व समजावून सांगितले. विद्यार्थ्यांशी झालेल्या या संवादाचा विद्यार्थ्यांनी मनापासून आनंद घेतला.
कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम् गीताने करण्यात आली.
हा संपूर्ण कार्यक्रम मुख्याध्यापिका सौ. निर्मल पंडित मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. सायली गायकवाड व श्री. रामकिसन जोगदंडे यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे शिक्षक सूरज साठे, विशाल तकमोगे, प्राजक्ता पिल्ले व स्नेहल गंगशेट्टीवार यांनी विशेष परिश्रम घेतले. देशभक्ती, शिस्त व प्रेरणादायी विचारांनी भरलेला हा प्रजासत्ताक दिन कार्यक्रम उपस्थित सर्वांसाठी संस्मरणीय ठरला.



More Stories
रणवीर हनुमान तरुण मंडळ वरची तालीम औंध मंडळ वतीने १११ वर्ष निमित्ताने आयोजित बाल चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
*मुळशी तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत पेरिविंकलच्या खेळाडूंची दमदार कामगिरी!!*
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!