पिरंगुट :
चैतन्य विद्या प्रतिष्ठान संचलित पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, पिरंगुट येथे ७७ वा प्रजासत्ताक दिन अत्यंत देशभक्तीपूर्ण व उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहणाने झाली.
यानंतर विद्यार्थ्यांनी मार्च पास्ट, सूर्यनमस्कार, एम.पी.टी., देशभक्तीपर गीत, घुंगरू काठी नृत्य सादरीकरण तसेच तायक्वांदो प्रात्यक्षिक सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
अंतरा रायरीकर, दिव्या राऊत व दूर्वा पवळे या विद्यार्थ्यांच्या देशप्रेमाने भारावलेल्या भाषणांनी कार्यक्रमास विशेष रंगत आणली.
कार्यक्रमादरम्यान विविध क्रीडा व उपक्रमांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा क्रीडा गौरव समारंभ पार पडला. तसेच वर्षभर राबविण्यात आलेल्या हाऊस स्पर्धांच्या आधारे ‘ऋग्वेद हाऊस’ ने प्रथम क्रमांक पटकावून विजेतेपद मिळवले, अशी अधिकृत घोषणा करण्यात आली. विजेत्या हाऊसच्या विद्यार्थ्यांचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते अभिनंदन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन व अंमलबजावणी ‘यजुर्वेद हाऊस’ च्या शिक्षकांनी उत्कृष्टरीत्या पार पाडली.
या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री. वैभव मुरकुटे, मा. श्री. बाळासाहेब विचारे तसेच श्री. योगेश सोनवणे (संचालक) उपस्थित होते.
संचालिका सौ. रेखा बांदल मॅडम यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले, तर यंग डायरेक्टर श्री. यश बांदल सर यांनी विद्यार्थ्यांचे मनापासून कौतुक केले.
कार्यक्रमाला संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. राजेंद्र बांदल, संचालिका सौ. रेखा बांदल व कु. शिवानी बांदल, तसेच शाळेच्या प्राचार्या सौ. आसावरी हंचाटे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी माध्यमिक विभागप्रमुख सौ. पूनम पांढरे, प्राथमिक विभागप्रमुख सौ. सना इनामदार व पूर्व-प्राथमिक विभागप्रमुख सौ. पल्लवी नारखेडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
समारोपप्रसंगी मान्यवरांनी प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व विशद करत विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, शिस्त व राष्ट्रीय एकात्मतेचे मूल्य रुजवण्याचे आवाहन केले. आभार प्रदर्शनानंतर ‘वंदे मातरम्’ गीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.



More Stories
*‘भक्तीचा उत्सव, पर्यावरणाची जपणूक!’ — पेरिविंकल बावधनमध्ये विद्यार्थ्यांनी साकारल्या Eco-Friendly गणेशमूर्ती!!*
वसुंधरा अभियानाच्या २०व्या वर्धापनदिनानिमित्त राजाभाऊ गुडदे फाउंडेशनचा सन्मान
*पेरिविंकलमधील सुस शाखेच्या विद्यार्थ्यांच्या हातून साकारला ‘पर्यावरणपूरक गणराया’!* *शाडू माती गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळेतून परंपरेसोबत दिला पर्यावरण संवर्धनाचा संदेश!!!*