बालेवाडी :
नागरिकांना सोयीस्कर पद्धतीने आधार सेवांचा लाभ मिळावा यासाठी ८ ते १३ सप्टेंबर या कालावधीत आधार कार्ड नोंदणी व दुरुस्ती अभियान राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आणि संसदीय कार्यमंत्री आमदार चंद्रकांतदादा पाटील व केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्या मार्गदर्शनाखाली, श्री. लहू गजानन बालवडकर (अध्यक्ष, कोथरूड विधानसभा उत्तर मंडळ) यांच्या वतीने आयोजित करण्यात आले आहे.
हे अभियान श्री. लहू गजानन बालवडकर जनसंपर्क कार्यालय, बालेवाडी येथे दररोज सकाळी १० ते सायं. ५ वाजेपर्यंत चालणार आहे.
लोकेशन – https://g.co/kgs/hywu4j7
या उपक्रमात नागरिकांना –
👉 नवीन आधार कार्ड बनवणे
👉 नाव / पत्ता दुरुस्ती
👉 जन्मतारीख बदल
👉 मोबाईल नंबर लिंक करणे व बायोमेट्रिक अपडेट
यांसारख्या सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
या अभियानाची माहिती देताना श्री. लहू गजानन बालवडकर यांनी नागरिकांना आवाहन केले की, “आपल्या दैनंदिन शासकीय कामकाजासाठी आधार कार्ड अत्यंत महत्त्वाचे साधन आहे. त्यामुळे सर्वांनी आवश्यक कागदपत्रांसह जनसंपर्क कार्यालयात येऊन या अभियानाचा लाभ घ्यावा.”
📞 संपर्कासाठी : ९३७१९९००७७ | ८३८०९९००७७


More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी