बालेवाडी :
राहुल दादा बालवडकर यांच्या पुढाकाराने दरवर्षीप्रमाणे यंदाही बालेवाडी येथील दसरा चौकात त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाजवळ गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलावाची व्यवस्था करण्यात आली होती. सलग अकरा दिवस या तलावात परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत तब्बल ६ ते ७ हजार गणेश मूर्तींचे विसर्जन केले.
विशेष म्हणजे, स्थानिक पोलीस बांधवांनीदेखील आपल्या गणपती बाप्पाचे विसर्जन याच कृत्रिम तलावात करून पर्यावरणपूरक उपक्रमात सहभाग नोंदवला.
विसर्जन काळात घडलेली एक छोटीशी घटना नागरिकांच्या चर्चेचा विषय ठरली. एका भाविकाची तब्बल साडेएक लाख रुपयांची सोन्याची चैन हरवली होती. मात्र, राहुल दादा बालवडकर जनसंपर्क कार्यालयातील कर्मचारी सुषांत पॉल यांना ती चैन सापडताच त्यांनी ती प्रामाणिकपणे परत करून प्रामाणिकतेचा आदर्श घालून दिला. उपस्थित नागरिकांनी त्यांच्या या कृतीचे मनापासून कौतुक केले.
या उपक्रमामुळे नदी-नाल्यांमध्ये होणारे प्रदूषण टळून विसर्जन सुरक्षित, स्वच्छ आणि पर्यावरणपूरक पद्धतीने पार पडले. नागरिकांनी राहुल दादा बालवडकर यांच्या सातत्यपूर्ण उपक्रमाचे मनापासून कौतुक करत त्यांचे आभार मानले.



More Stories
“उच्च तंत्र की तंत्रमंत्र? अमोल बालवडकरांचा भोंदू खरात सोबत फोटो वरून चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा”
औंध ग्रामदैवत भैरवनाथ महाराज उत्सव ३ मे रोजी; ग्रामसभेत तारीख जाहीर
लहानग्यांच्या स्वप्नांना मिळाले पंख: पेरिविंकल पिरंगुटमध्ये सीनियर केजी ग्रॅज्युएशन डे जल्लोषात साजरा!!!