June 22, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

पेरिविंकल स्कूलमध्ये ‘योगा फॉर हार्मनी, हेल्थ अँड हॅपिनेस’ अंतर्गत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

पिरंगुट :

चैतन्य विद्या प्रतिष्ठान संचलित पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, पिरंगुट येथे “योगा फॉर हार्मनी, हेल्थ अँड हॅपिनेस” या संकल्पनेवर आधारित आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याचबरोबर जागतिक संगीत दिनही साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजनाने झाली. या प्रसंगी पतंजली योग समितीचे प्रसिद्ध योग प्रशिक्षक श्री. संजय टापकिर, श्री. अशोक माने व श्री. देविदास तनपुरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. मान्यवरांचा सन्मान करून त्यांचे स्वागत करण्यात आले.

कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण विद्यार्थ्यांनी सादर केलेले भव्य योग प्रात्यक्षिक होते. योग प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी ताडासन, वृक्षासन, भुजंगासन, वज्रासन, पद्मासन आणि त्रिकोणासन यांसारखी विविध योगासने सादर करून शिस्त, एकाग्रता आणि शारीरिक तंदुरुस्तीचे उत्कृष्ट दर्शन घडविले.

यावेळी श्री. संजय टापकिर यांनी विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व पटवून देत नियमित योगाभ्यास करण्याचे आवाहन केले. संचालिका कु. शिवानी बांदल यांनी योगामुळे शारीरिक स्वास्थ्याबरोबरच मानसिक शांतता आणि आत्मविश्वास वाढतो, असे सांगितले.

हा कार्यक्रम संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. राजेंद्र बांदल, संचालिका सौ. रेखा बांदल, कु. शिवानी बांदल तसेच सर्व शाखांच्या मुख्याध्यापिका सौ. निर्मल पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.

शाळेच्या प्राचार्या सौ. इनायत मुजावर, पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख सौ. पल्लवी नरखेडे, प्राथमिक विभाग प्रमुख सौ. सना इनामदार आणि माध्यमिक विभाग प्रमुख सौ. रुपाली गर्ग यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम अत्यंत यशस्वी ठरला.

कार्यक्रमाच्या शेवटी “योग ही भारताने जगाला दिलेली अमूल्य देणगी असून निरोगी शरीर, शांत मन आणि आनंदी जीवनाचा मार्ग आहे” हा संदेश देण्यात आला.