पौड :
चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या पेरीविंकल इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पौड शाखेमध्ये जागतिक योगा दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात *सरस्वती पूजनाने झाली.यावेळी *पेरीविंकल प्रशालेच्या संचालिका शिवानी बांदल मॅडम* आणि *मुख्याध्यापिका वीणा कदम मॅडम* उपस्थित होत्या. प्रशालेचा इयत्ता सहावीचा विद्यार्थी तनुज धनवे याने योगाचे प्रतिनिधित्व केले, त्यानुसार शिक्षक आणि विद्यार्थी यांनी योगाचे प्रात्यक्षिक केले. प्रशालेच्या इयत्ता नववीचे विद्यार्थी अनुज मेंगडे ,श्रेयसी जाधव आणि समृद्धी वचकवडे यांनी योगा दिनाचे महत्त्व आपल्या शब्दात व्यक्त केले.
या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री राजेंद्र बांदल सर आणि संचालिका रेखा बांदल मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. मुख्याध्यापिका वीणा कदम मॅडम पर्यवेक्षिका नेत्रा काकडे व प्राजक्ता वाघवले तसेच सर्व शिक्षक व विद्यार्थी वर्ग यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्कृती भिलारे आणि संस्कृती पिंगळे यांनी केले.


More Stories
रणवीर हनुमान तरुण मंडळ वरची तालीम औंध मंडळ वतीने १११ वर्ष निमित्ताने आयोजित बाल चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
*मुळशी तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत पेरिविंकलच्या खेळाडूंची दमदार कामगिरी!!*
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!