औंध-बाणेर :
औंध, पाषाण, सुतारवाडी, बाणेर, बालेवाडी, सुस, म्हाळुंगे या परिसरात यंदाचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा झाला. मा. संदीप कदम (उप आयुक्त – घनकचरा व्यवस्थापन), मा. अरविंद माळी (उप आयुक्त – परिमंडळ क्र. २), मा. अविनाश सकपाळ (उप आयुक्त) तसेच मा. गिरीष दापकेकर (सहाय्यक आयुक्त – औंध बाणेर क्षेत्रीय कार्यालय) यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण गणेशोत्सव काळात उत्कृष्ट स्वच्छता आणि विसर्जन व्यवस्थापन करण्यात आले.
नागरिकांच्या सोयीसाठी १२ ठिकाणी विसर्जन घाटांवर कृत्रिम हौद उभारण्यात आले, तर १७ ठिकाणी मूर्ती दान संकलन केंद्र उभारण्यात आले. या ठिकाणी स्वच्छता, विद्युत रोषणाई, निर्माल्य संकलन, स्वच्छतागृह आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. यंदा बहुतांश नागरिकांनी शाडू मातीच्या मूर्तींची स्थापना करून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा केला.
औंध-बाणेर क्षेत्रात एकूण ६३,०७७ मूर्तींचे विसर्जन/संकलन झाले. त्यात ४९,४८३ मूर्ती कृत्रिम हौदात विसर्जित करण्यात आल्या, तर १३,५९४ मूर्ती दान संकलन केंद्रावर जमा झाल्या. याशिवाय ६७.१५६ मेट्रिक टन निर्माल्य आरोग्य विभागामार्फत गोळा करण्यात आले.
विशेष म्हणजे, विसर्जन घाटांवरील महानगरपालिकेची उत्तम व्यवस्था पाहून पिंपरी-चिंचवड परिसरातील सांगवी, पिंपळे गुरव, पिंपळे निलख येथील नागरिकही औंध-बाणेर विभागातील घाटांवर विसर्जनासाठी आले.
या संपूर्ण कामकाजात अधिकारी श्री. विजय खेवजी भोईर (वरिष्ठ आरोग्य निरीक्षक), श्री. दिपक लांडे (उपअभियंता), श्री. विजय वाघमोडे (उपअभियंता) यांच्यासह सर्व कनिष्ठ अभियंते, आरोग्य निरीक्षक, मोकादम, सफाई सेवक, आरोग्य विभाग, मोटार वाहन विभाग, स्थापत्य विभाग, विद्युत विभाग यांनी उत्कृष्ट समन्वय साधत निर्विघ्नपणे गणेशोत्सव पार पाडला.
👉 औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालयाच्या काटेकोर नियोजनामुळे यंदाचा गणेशोत्सव उत्साह, श्रद्धा आणि पर्यावरणपूरकतेचा आदर्श ठरला.



More Stories
रणवीर हनुमान तरुण मंडळ वरची तालीम औंध मंडळ वतीने १११ वर्ष निमित्ताने आयोजित बाल चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
*मुळशी तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत पेरिविंकलच्या खेळाडूंची दमदार कामगिरी!!*
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!