पाषाण :
प्रभाग क्रमांक नऊ (सोमेश्वरवाडी, पाषाण सुतारवाडी, बाणेर, बालेवाडी, सुस व महाळुंगे) येथील महिला भगिनींसाठी सचिन दळवी सोशल फाउंडेशन तर्फे, भाजपा कोथरूड विधानसभा उत्तर मंडल सरचिटणीस सचिन चिंतामणी दळवी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या घरगुती गौरी गणपती सजावट स्पर्धा २०२५ चा बक्षीस वितरण समारंभ बुधवार दि. १० सप्टेंबर २०२५ रोजी सायं. ६ वा. ज्ञानदीप मंगल कार्यालय, पाषाण-सुस रोड येथे संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमास सिने अभिनेत्री श्रुती मराठे प्रमुख उपस्थिती लाभणार असून विशेष अतिथी म्हणून मान्यवर पाहुण्यांची उपस्थिती राहणार आहे.
स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व महिलांना आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार असून विजेत्यांसाठी दुचाकी, फ्रिज, वॉशिंग मशीन, एलईडी टीव्ही अशा भरगच्च बक्षिसांची सोय आयोजकांनी केली आहे.
आमचे मार्गदर्शक उच्च तंत्र शिक्षण मंत्री आणि संसदीय कार्यमंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्या मार्गदर्शनाखाली घरगुती गौरी गणपती सजावट स्पर्धा या उपक्रमामागील उद्दिष्ट म्हणजे महिलांच्या सृजनशीलतेला प्रोत्साहन देणे तसेच सणावार अधिक उत्साहात साजरे करणे, असे आयोजक श्री. सचिन चिंतामणी दळवी (सरचिटणीस, भारतीय जनता पार्टी, कोथरूड विधानसभा) यांनी सांगितले.
☎️ अधिक माहितीसाठी संपर्क : 70283 81352 / 88303 97638


More Stories
“उच्च तंत्र की तंत्रमंत्र? अमोल बालवडकरांचा भोंदू खरात सोबत फोटो वरून चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा”
औंध ग्रामदैवत भैरवनाथ महाराज उत्सव ३ मे रोजी; ग्रामसभेत तारीख जाहीर
लहानग्यांच्या स्वप्नांना मिळाले पंख: पेरिविंकल पिरंगुटमध्ये सीनियर केजी ग्रॅज्युएशन डे जल्लोषात साजरा!!!