February 4, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

पर्यावरणपूरक श्री गणेश विसर्जन उपक्रमाला बाणेरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, ज्योती कळमकर यांचा उपक्रम..

बाणेर :

बाणेर परिसरात माजी नगरसेविका ज्योती कळमकर आणि भाजपा नेते गणेश कळमकर यांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील गणेश विसर्जनासाठी विशेष कृत्रिम तलावाची व्यवस्था करण्यात आली होती. गणराज चौकातील माजी नगरसेविका ज्योती कळमकर यांच्या भाजपा जनसंपर्क कार्यालय, गणेश मंदिर शेजारी उभारण्यात आलेल्या कुत्रीम तलावामध्ये नागरिकांनी मोठ्या प्रमाणात मूर्ती विसर्जन केले. यावेळी साधारण 1100 मूर्ती याठिकाणी विसर्जित झाल्या.

पर्यावरणपूरक विसर्जनाचा संदेश देण्यासाठी करण्यात आलेल्या या उपक्रमात नागरिकांनी स्वखुशीने सहभाग घेतला. तलावाजवळ निर्माल्य संकलनासाठी स्वतंत्र कलश ठेवण्यात आला होता. या माध्यमातून निसर्गाला अपाय न करता धार्मिक परंपरा पार पाडता येऊ शकते, याचे उत्तम उदाहरण बाणेरमध्ये दिसून आले.

नागरिकांनी या उपक्रमाचे कौतुक करत सांगितले की, अशा प्रकारच्या उपक्रमामुळे नदी-नाले प्रदूषणापासून वाचतील आणि भावी पिढ्यांसाठी स्वच्छ पर्यावरण जपले जाईल. विसर्जनाच्या ठिकाणी शिस्तबद्ध व्यवस्था, स्वयंसेवकांची उपस्थिती आणि स्वच्छतेची काटेकोर खबरदारी यामुळे संपूर्ण कार्यक्रम सुरळीत पार पडला.

माजी नगरसेविका ज्योती कळमकर आणि भाजपा नेते गणेश कळमकर यांनी नागरिकांचे आभार मानत सांगितले की, “आपल्या श्रद्धा आणि परंपरा जपत पर्यावरणाचे रक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. हा उपक्रम त्याच दिशेने टाकलेले एक छोटे पाऊल आहे.”