बाणेर :
योगीराज नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित बाणेर येथे लक्ष्मी पूजन व तिजोरी पूजन उत्साहात संपन्न झाले. यंदाचे लक्ष्मी पूजन माजी नगरसेविका रंजना व माजी पंचायत समिती सदस्य अशोक मुरकुटे, माजी नगरसेविका स्वप्नाली व प्रल्हाद सायकर तसेच अभिनेत्री मृणाल व सुमित गायकवाड या तीन यशस्वी दाम्पत्यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर तापकीर यांनी संस्थेच्या आर्थिक प्रगतीचा आढावा घेतला. संस्थेच्या ठेवी 170 कोटी रुपये, सभासदांना वितरित केलेले कर्ज 130 कोटी रुपये असून चालू वर्षाचा निव्वळ नफा 4 कोटी 55 लाख रुपये झाल्याचे त्यांनी सांगितले. संस्थेने आर्थिक प्रगतीबरोबरच सामाजिक बांधिलकी जपण्यावर नेहमीच भर दिला असल्याचेही त्यांनी नमूद केले.
संपूर्ण महाराष्ट्र यावर्षी दुष्काळाचा सामना करीत असल्याने योगीराज पतसंस्थेने यंदाची दिवाळी साधेपणाने साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. दिवाळीनिमित्त होणारा अनावश्यक खर्च टाळून त्यातून वाचणारी रक्कम दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी दुष्काळ निधीमध्ये देण्याचे संस्थेने ठरविले आहे. या निर्णयातून संस्थेची सामाजिक बांधिलकी आणि संवेदनशीलता अधोरेखित झाली.
लक्ष्मी पूजनाच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी उद्योजक प्रमोदकुमार बेलसरे यांनी संस्थेमध्ये ठेवीचा चेक सुपूर्द केला. संस्थेवरील विश्वास आणि सातत्यपूर्ण सहकार्याचे हे प्रतीक असल्याचे यावेळी आवर्जून सांगण्यात आले.
या कार्यक्रमास निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त पिंगळे साहेब, डॉ. वझरकर, निवृत्त शिक्षक आत्माराम जाधव, जनार्दन शिंदे, प्रल्हाद मुरकुटे, विजय विधाते, संस्थेचे उपाध्यक्ष राजेश विधाते, शाखाध्यक्ष राजेंद्र मुरकुटे, संचालक गणेश तापकीर, संचालिका वैशाली विधाते, रंजना कोलते, माजी संचालक वसंत माळी, अमर लोंढे, अशोक रानवडे, शाखा व्यवस्थापिका सीमा डोके तसेच संस्थेचे सर्व कर्मचारी व दैनंदिन प्रतिनिधी उपस्थित होते.
कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांचे स्वागत संस्थेचे तज्ञ संचालक रविंद्र घाटे यांनी केले, तर आभार प्रदर्शन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय गंगणे यांनी मानले.
योगीराज पतसंस्थेने आर्थिक प्रगतीसोबत सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव ठेवत दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात देण्याचा घेतलेला निर्णय हा समाजाप्रती असलेल्या संस्थेच्या बांधिलकीचा आदर्श ठरत आहे.


More Stories
औंध-बोपोडी परिसरात पाच ठिकाणी सार्वजनिक वसुबारस पूजन उत्साहात संपन्न, नगरसेवक सनी विनायक निम्हण यांच्या पुढाकारातून नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग
*संगीताच्या सुरेल मैफलीने रसिक मंत्रमुग्ध; दिवाळी बोनस वितरणातून शिक्षकांच्या योगदानाचा सन्मान, पेरीविंकल परिवारात उत्साह आणि स्नेहाचा जागर!*
*औंध-बोपोडी परिसरात पाच ठिकाणी सार्वजनिक वसुबारस पूजनाचे आयोजन, नगरसेवक सनी विनायक निम्हण यांचे नागरिकांना कुटुंबासह सहभागी होण्याचे आवाहन*