शिक्षक हे केवळ पुस्तक शिकवत नसून ते मार्गदर्शक असतात – शिक्षकदिनानिमित्त प्रसिद्ध साहित्यिक मा श्री विं. दा. पिंगळे यांचे प्रतिपादन !!!
पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटस च्या बावधन शाखेमध्ये शिक्षक दिनानिमित्त सर्व ६ शाखांमधील सर्व शिक्षक -गुरूंचा सन्मान*!!!
बावधन :
चैतन्य विद्या प्रतिष्ठान च्या पेरिविंकल इंग्लीश मिडीयम स्कूल अँड ज्यु.कॉलेज च्या बावधन शाखेमध्ये आज शुक्रवार दिनांक ५ सप्टेंबर रोजी सर्व म्हणजेच सूस, पिरंगुट, पौड, कोळवण व माले शाखेतील सुमारे ३०० शिक्षकांसह आज शिक्षक दिन मोठ्या प्रमाणात अत्यंत उत्साहात व आनंदात साजरा करण्यात आला .
दरवर्षी ५ सप्टेंबर हा शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन करणारे आणि अडचणीतून बाहेर पडण्यासाठी वाट दाखविणारे गुरुजनाविषयी कृतज्ञता व्यक्त करणारा हा दिवस!!!सालाबादप्रमाणे यावर्षीही पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये शिक्षकदिन अत्यंत उत्साहाने साजरा करण्यात आला. या वर्षी दुग्धशर्करा योगाने सर्व शाखांचा एकत्रित शिक्षक दिन सोहळा साजरा करण्याचे औचित्य साधून आले.
शाळेतील सर्व विद्यार्थी गुरूजनांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी उत्सुक होते. सर्व गुरुजन शिक्षकांना पारंपारिक औक्षण करून फुलांच्या पायघड्या घालून तसेच विद्यार्थ्यांनी बनवलेले भेटकार्ड व पुष्पगुच्छ देऊन शिक्षक गुरुजन व उपस्थित मान्यवरांचे व पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाचा प्रारंभ पारंपारिक सरस्वती पूजन व सर्वेपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आला. दीप प्रज्वलन करून मान्यवरांनी प्रतिमेचे पूजन केले.
या प्रसंगी प्रमुख अतिथी मान्यवर प्रख्यात साहित्यिक व २०१५ चे आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते मा. श्री विं. दा पिंगळे सर, सुप्रसिद्ध वकील व लंडन येथे कार्यरत असणारे मा. श्री रविंद्र लगाडे सर, शास्त्र विषयात पीएचडी असलेले श्री पाटील सर, शिक्षणक्षेत्रात नाव लौकिक असलेले श्री मगर सर, श्री संदीप ढमढेरे तसेच पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष श्री रमेश ससार, पप्पू कंधारे, कालिदास नगरे, रोहिदास धुमाळ, अर्जुन पसाले, केतन सुर्वे, रोखठोक चे गणेश हुंबे, झुंज चे प्रसाद वडगुले आदी सर्व पत्रकार बांधव तसेच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा .श्री.राजेंद्र बांदल सर , संचालिका सौ रेखा बांदल, शिवानी बांदल शाळेच्या मुख्याध्यापिका सौ निर्मल पंडित व अन्य शाखेच्या मुख्याध्यापिका सौ आसावरी हंचाटे व वीणा कदम आदी मान्यवर उपस्थित होते.
सरस्वती पूजनानंतर कार्यक्रमाचा प्रारंभ
मैं शिक्षक हुं … या हिंदी काव्यरचनेने करण्यात आला.
आलेल्या सर्व मान्यवरांचे शाल ,श्रीफळ व पुणेरी पगडी घालून पुष्पगुच्छ प्रदान करुन शाळेचे संस्थापक मा बांदल सर यांच्याकडून स्वागत कऱण्यात आले.
त्या नंतर सूस शाखेच्या कनिष्ठ महाविद्यालयाच्या शिक्षक श्रद्धा पच्चीगर , बावधन शाखेच्या पर्यवेक्षिका शिरीन काझी व पिरंगुट शाखेच्या मुख्याध्यापिका सौ आसावरी हांचाटे यांनी आजच्या जगातील शिक्षकांचे महत्व सांगून सर्वांच्या मनातील शिक्षकांचे स्थान अढळ केले व शिक्षक असल्याचा अभिमान व्यक्त करून शाळेप्रती व संस्थेप्रती असलेला आदर व्यक्त केला.
शिक्षक दिनाचे औचित्य साधून शाळेतील सर्व शाखेतील गूरूजन- शिक्षकांचा संस्थेकडून सन्मान करण्यात आला तसेच शाळेचे संस्थापक श्री बांदल सर व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सर्व शिक्षकांना व सर्व पत्रकार बांधवांना विश्वासाचे व प्रेमाचे प्रतीक म्हणून भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले .
तर शिक्षकांच्या आज्ञेचे पालन करून निशंक मनाने काम केल्यास प्रगतीच होतेच व गुरुबळ म्हणजे काय याची प्रचिती येते तसेच एक शिक्षक राष्ट्रपती होऊ शकतो व राष्ट्रपती पदावरून गेल्यावर सुद्धा एक शिक्षक होऊ शकतो व पुढील अनेक राष्ट्रपती ,इंजिनियर, डॉक्टर घडवू शकतो. अनेक पिढ्या शिक्षक लक्षात ठेवतात येवढी ताकद एका शिक्षकात असते त्यामुळे हे अत्यंत मानाचे प्रतीक असून शिक्षकी पेशा हा केवळ नशीबवान लोकांनाच उपभोगता येतो असे संस्थेचे अध्यक्ष श्री राजेंद्र बांदल यांनी त्यांच्या भाषणात सांगितले व सर्वांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
तर गुरुशिवाय जीवन अपूर्ण – मा श्री रवींद्र लगाडे सरांचा एक विचार” “कबीरानी आपल्या गुरुला इतकं महत्त्व दिलं की, त्यांनी स्पष्टपणे म्हटलं – ‘मी भगवानालाही बाजूला ठेवीन, पण माझ्या गुरूला नाही. कारण गुरुशिवाय तर मला भगवंत कळणारच नाही.’”कबीर म्हणतात “गुरु गोविंद दोऊ उभे, काके लागूं पाय? असे सांगून श्री लगाडे सर यांनी सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
तर प्रमुख अतिथी व प्रसिद्ध साहित्यिक मा. श्री पिंगळे सर यांनी अध्यात्मिक प्रवासात गुरु हे केवळ शिक्षक नसतात, ते ‘मार्गदर्शक’ असतात असे प्रतिपादन करून ते फक्त पुस्तक शिकवत नाहीत, तर “जीवन कसं जगावं” हे शिकवतात असे सांगून “शिक्षक आपल्याला जगायला शिकवतो, पण गुरु आपल्याला का जगायचं ते शिकवतो असे सांगून अतिशय मनवेदक असे भाषण केले आपल्या भाषणात त्यांनी अतिशय प्रेरणादायी गोष्टी सांगितल्या विद्यार्थी घडवायचे नाहीयेत तर माणसं घडवायचेत माणसं जोडायचेत माणसं जोडणारी माणसं तयार करायची आहेत हे एका छोट्या गोष्टीतून सांगून या देशात शिक्षकांचा सन्मान होतो असे सांगून भविष्याची पुनर्कल्पना मजबूत आणि टिकाऊ करण्यासाठी पेरीविंकल मधील सगळे शिक्षक सर्व क्षेत्रात अग्रेसर आहेत व राहतील याची हमी त्यांच्या भाषणाद्वारे दिली.
प्रशालेतील सर्व शिक्षकांचा सत्कार तसेच भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात येऊन सर्व शिक्षकांचा गौरव करण्यात आला हे आजकालच्या जगात खूप कमी ठिकाणी बघायला मिळते असे असे मत व्यक्त करुन सर्वांना शिक्षकदिनाच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाची सांगता सर्वांचे धन्यवाद मानून शाळेच्या मुख्याध्यापिका सौ निर्मल पंडित यांनी केली. यावेळी शिक्षक दिनाच्या दिवशी सर्व मान्यवरांकडून व गूरूजनांच्या हस्ते असा सन्मान मिळणे हाच खरा शिक्षकांचा आदर असे प्रतिपादन करून शिक्षकांचे जीवनातील महत्व शाळेच्या मुख्याध्यापिका सौ निर्मल पंडित यांनी त्यांच्या भाषणात मनोगत व्यक्त करताना केले. सर्व उपस्थित मान्यवर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, सर्व पत्रकार बांधव या सर्वांचे मन:पूर्वक आभार मानून पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
संपूर्ण कार्यकमाचे नियोजन शाळेचे संस्थापक अध्यक्ष श्री राजेंद्र बांदल , संचालिका सौ रेखा बांदल , शिवानी बांदल यांच्या अध्यक्षतेखाली शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. निर्मल पंडित ह्यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते. बावधन शाखेच्या पर्यवेक्षक सायली गायकवाड व शिरीन काझी यांच्या समवेत सर्व शिक्षकवृंद व व सहकारी ह्यांच्या सहकार्याने शिक्षक दिनाचा हा कार्यक्रम अतिशय आनंदात उत्साहात व शिस्तबद्ध पद्धतीने संपन्न झाला.
संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सायली गायकवाड व प्रफुल्ला पाटील यांनी केले.
कार्यक्रमानंतर सर्व शिक्षकांसाठी व उपस्थित मान्यवर व पत्रकार बांधव या सर्वांसाठी विशेष भोजनाचे आयोजन करण्यात आले होते जेथे शिक्षकांनी सर्वांनी एकत्र येऊन गप्पा मारल्या आणि स्नेह भोजनाचा मनमुराद आनंद घेतला.
या कार्यक्रमामुळे पेरीविंकल इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज मध्ये शिक्षक दिन २०२५ हा दिवस प्रेरणादायी आणि संस्मरणीय ठरला.
सर्व शिक्षकांना आणि पाहुण्यांना सन्मानित करणे हे शाळेच्या संस्कृतीतल्या एक महत्त्वाचा भाग असल्याचे सिद्ध झाले.
अशाप्रकारे आजचा हा शिक्षकदिन सोहळा खरोखर प्रत्येकाच्या मनात कायम घर करून राहील असा अविस्मरणीय ठरला.



More Stories
योगीराज पतसंस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप….
पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल, सूस येथे दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा भावस्पर्शी निरोपसमारंभ सोहळा संपन्न.
“शिक्षणाबरोबरच मूल्यसंस्कार घडले तरच विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल होते” – मा. आमदार शरद ढमाले