औंध :
औंध परिसरातील बोपोडी महादेव घाट, बोपोडी शांता आपटे घाट, राजीव गांधी घाट, मलिंग घाट तसेच सोमेश्वरवाडी घाट (म.न.पा. शाळा) येथे सोमेश्वर फाऊंडेशनच्या उपक्रमातून कृत्रिम घाटांवर गणेश विसर्जन मोठ्या श्रद्धा, उत्साह व थाटामाटात पार पडले.
सात दिवसांच्या गणेशोत्सवानंतर परिसरातील नागरिक आणि गणेशप्रेमी भक्तांनी परंपरेनुसार बाप्पाचे विसर्जन करताना पर्यावरणपूरक कृत्रिम घाटाचा स्वीकार केला. या उपक्रमात सहभागी झालेल्या प्रत्येक भक्ताचा सोमेश्वर फाऊंडेशनच्या वतीने सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. या अनोख्या उपक्रमाचे सर्व उपस्थितांनी मनापासून कौतुक केले.
या सोहळ्यात श्रद्धेचा उत्साह तर होता, पण त्याचबरोबर पर्यावरण संवर्धनाचा महत्त्वपूर्ण संदेशही देण्यात आला. “चला, परंपरेला साजरे करताना पर्यावरणाचे रक्षण करूया,” असे आवाहन माजी नगरसेवक सनी विनायक निम्हण यांनी केले.



More Stories
पाषाण कार्यालयात जागतिक योग दिनानिमित्त योग शिबिराचे आयोजन
परिहार चौक परिसरातील अतिक्रमणावर कारवाईचे आश्वासन; सनी निम्हण यांचा पाठपुरावा
पेरिविंकल स्कूलमध्ये ‘योगा फॉर हार्मनी, हेल्थ अँड हॅपिनेस’ अंतर्गत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा